रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलाबद्दल अलर्ट केलं आहे. एटीएम शुल्क, मोफत पैसे काढण्याची सुविधा, कॉन्टॅक्टलेस पेमेंट आणि कार्ड सुरक्षिततेबद्दल नियमात बदल करण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. 2008 ते 2022 या काळातील सर्व सर्क्युलर रद्द करत एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
1/7
ATM मधून पैसे विड्रॉल करण्याचे नियम बदले
गव्हर्नरांनी नवे सर्क्युलर लागू करतानाच जुनी 17 सर्क्युलर रद्द करत व्हाइट लेबल एटीएम चालवणाऱ्या कंपन्यांनाही बँका आणि रिझर्व्ह बँकेकडून रोख रक्कम घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
2/7
ATM मधून पैसे विड्रॉल करण्याचे नियम बदले
सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना महिन्याला किती मोफत एटीएम व्यवहार करता येतील आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी किती शुल्क भरावे लागेल याची ग्राहकांना माहिती देणे बंधनकारक असणार आहे.
3/7
ATM मधून पैसे विड्रॉल करण्याचे नियम बदले
बँकांना त्यांचे कोणते एटीएम मेट्रो शहरांमध्ये आहेत आणि कोणते नॉन-मेट्रो शहरांमध्ये हेदेखील सांगावे लागणार आहे.
4/7
ATM मधून पैसे विड्रॉल करण्याचे नियम बदले
एटीएममधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेत कोणताही बदल झालेले नाहीत. बचत खात्यावर दर महिन्याला स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून 5 व्यवहार मोफत करु शकता.
5/7
ATM मधून पैसे विड्रॉल करण्याचे नियम बदले
इतर बँकांच्या एटीएममधून महिन्याला 3 मोफत व्यवहार, तर मेट्रो शहरांसाठी ही मर्यादा 3 तर नॉन-मेट्रो शहरांसाठी 5 व्यवहार इतकी असणार आहे.
6/7
ATM मधून पैसे विड्रॉल करण्याचे नियम बदले
जर व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
7/7
ATM मधून पैसे विड्रॉल करण्याचे नियम बदले
महत्त्वाचे म्हणजे एटीएममधून केलेला एखादा व्यवहार अयशस्वी झाल्यास त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.