• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /नितिन गडकरींची मोठी घोषणा,100 टक्के इथेनॉलवर धावणारी इनोव्हा;किंमत आणि मायलेज किती?

नितिन गडकरींची मोठी घोषणा,100 टक्के इथेनॉलवर धावणारी इनोव्हा;किंमत आणि मायलेज किती?

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 05, 2026, 09:15 PM IST|Updated: Nov 05, 2026, 09:28 PM IST
joinshare
हायब्रिड इंजिन, तंत्रज्ञान आणि संभाव्य फायद्यांविषयी जाणून घेऊया.

नितीन गडकरी यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणारी टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फ्लेक्स-फ्युएल कार नोव्हेंबरमध्ये सादर करण्याची घोषणा केली. 

Innova that runs on 100% ethanol1/8

नितिन गडकरींची मोठी घोषणा,100 टक्के इथेनॉलवर धावणारी इनोव्हा;किंमत आणि मायलेज किती?

पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधण्याच्या प्रयत्नांना आता वाहन क्षेत्रातून नवी दिशा मिळू शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोयोटाची फ्लेक्स-फ्युएल इनोव्हा नोव्हेंबर 2026 मध्ये सादर करणार असल्याचे सांगितले. ही गाडी 100 टक्के बायोइथेनॉल म्हणजेच E100 इंधनावर चालण्यास सक्षम असेल. नवी दिल्ली येथे झालेल्या एनरिच 2026 ऊर्जा परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
इथेनॉल इंधन2/8

पेट्रोलसोबत इथेनॉलचे मिश्रणही वापरता येणार

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ शुद्ध इथेनॉलवरच नव्हे, तर पेट्रोल आणि इथेनॉलच्या सुसंगत मिश्रणावरही चालू शकेल. यालाच फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञान म्हटले जाते. सध्या भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केले जाते. मात्र, E100 म्हणजे जवळपास पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी गाडी असेल.
फ्लेक्स फ्युएल कार,3/8

इथेनॉल इंजिनसोबत हायब्रिड तंत्रज्ञानाची जोड

या इनोव्हामध्ये इथेनॉलवर चालण्यासाठी बदल केलेले पेट्रोल इंजिन आणि टोयोटाचे स्ट्राँग हायब्रिड तंत्रज्ञान असण्याची शक्यता आहे. म्हणजेच इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीचीही मदत मिळेल. कमी वेगात गाडी इलेक्ट्रिक मोडवर चालू शकते.
 टोयोटा इनोव्हा4/8

दीड वर्षांपासून गडकरी वापरतायत गाडी

गडकरी यांनी परिषदेत सांगितले की, टोयोटाने उपलब्ध करून दिलेली फ्लेक्स-फ्युएल इनोव्हा ते स्वतः गेल्या दीड वर्षांपासून वापरत आहेत. म्हणजेच ही गाडी केवळ संकल्पना किंवा प्रदर्शनापुरती मर्यादित नसून तिच्या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू आहे.
इथेनॉलवर चालणारी कार5/8

2023 मध्येच प्रोटोटाइप

टोयोटाने ऑगस्ट 2023 मध्ये इनोव्हा हायक्रॉसवर आधारित इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-फ्युएल वाहनाचा प्रोटोटाइप सादर केला होता. त्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी उपस्थित होते. या वाहनात फ्लेक्स-फ्युएल इंजिनसोबत इलेक्ट्रिक पॉवरट्रेन देण्यात आली होती.
100 Percent Ethanol Car6/8

इथेनॉलमुळे मायलेज कमी होणार का?

इथेनॉलमध्ये प्रतिलिटर पेट्रोलच्या तुलनेत कमी ऊर्जा असते. त्यामुळे 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाडीचे मायलेज पेट्रोलच्या तुलनेत कमी असण्याची शक्यता असते. मात्र, हायब्रिड तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिक मोटरची मदत मिळेल.
Nitin Gadkari Flex Fuel Car7/8

इनोव्हा हायक्रॉसच्या डिझाइनमध्येही बदल

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या अपडेटेड मॉडेलमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, बदललेले बंपर, सुधारित टेल लॅम्प आणि नवीन अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे. इंटिरिअरमध्ये 12.3 इंचांची टचस्क्रीन आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळू शकतो.
Toyota Innova Hycross Flex Fuel8/8

किंमत, मायलेज आणि इंधन

या फ्लेक्स-फ्युएल इनोव्हाची किंमत, बुकिंग आणि ग्राहकांना डिलिव्हरी कधी मिळणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच देशभरात E100 इंधन उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणेही महत्त्वाचे ठरणार आहे. इथेनॉलचा वापर वाढल्यास कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते.
TAGS:
Nitin Gadkari

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
दिवाळीच्या फराळासाठी खास! हलवाईसारखे मऊ आणि परफेक्ट बुंदीचे लाडू बनवा घरच्या घरी

दिवाळीच्या फराळासाठी खास! हलवाईसारखे मऊ आणि परफेक्ट बुंदीचे लाडू बनवा घरच्या घरी

2

मुंबई इंडियन्सच्या सामान्यांचं शेड्युल समोर, पाहा कधी अन् कुठे खेळवले जाणार?

3

बुमराह आणि जडेजा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज! 'या' दिवशी खेळणार सामना

4

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना किती वाजता होणार सुरु? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

5

भारताने पाकिस्तानला आणखी एकदा हरवलं! टीम इंडियाची विजयी सुरुवात

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.