भारतरत्न हा देशातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार असून आतापर्यंत तो नेमका कोणत्या पंतप्रधानांना कधी मिळाला आहे, तो मोदींना देण्याची मागणी कोणी केलीये? जाणून घ्या सविस्तर...
पंतप्रधान मोदींना देशातील सर्वात मोठा पुरस्कार देण्याची मागणी करताना नक्की काय म्हटलंय पाहूयात...
1/9
मोदींनी दिला जाणार भारतरत्न?
कोणी आणि काय कारण देत करण्यात आली आहे पंतप्रधान मोदींना हा सर्वोच्च पुरस्कार देण्याची मागणी, नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या सविस्तरपणे...
2/9
शाह यांच्याकडे मोदींना भारतरत्न पुरस्कार देण्याची विनंती
भारताच्या तरुण पिढीने, म्हणजेच 'जेन झी'ने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतरत्न पुरस्काराची मागणी केली आहे. तरुणांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोदींना भारतरत्न पुरस्कार देण्याची विनंती केल्याचा दावा पंजाबचे राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनी केला आहे.
3/9
25 वर्षांची लोकसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 25 वर्षांची लोकसेवा ही राष्ट्राप्रती असलेल्या असाधारण समर्पण आणि वचनबद्धतेचा प्रवास आहे, असं खासदार विक्रमजीत सिंह साहनी म्हणाले.
4/9
स्वतः पद्मश्री पुरस्कार
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींना भारतरत्न पुरस्काराची मागणी करणारे डॉ. विक्रमजीत सिंह साहनी हे स्वतः पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत.
5/9
भारताची प्रतिमा 360 अंशांनी पूर्णपणे बदलली
भूतकाळात अनेक पंतप्रधानांना हा सन्मान मिळाला असला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने या पुरस्कारासाठी पात्र आहेत. त्यांनी भारताची प्रतिमा 360 अंशांनी पूर्णपणे बदलली आहे, असा दावा खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनी केला.
6/9
नरेंद्र मोदींना भारतरत्न देण्याची मागणी
भारताच्या 9 पंतप्रधानांना यापूर्वी देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश असावा अशी इच्छा एका खासदाराने बोलून दाखवली आहे.
7/9
2500 हून अधिक तरुणांनी मागणी केल्याचा दावा
साहनी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेकडे या विषयाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. राष्ट्रीय संग्रहालयात आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनात 'जेन झी'चे 2500 हून अधिक तरुण सहभागी झाले होते. त्यांनी ही मागणी केल्याचं भाजपा खासदाराने म्हटलंय.
8/9
भारतरत्न मिळण्यास मोदी पात्र
"भारताप्रती मोदींची निष्ठा, समर्पण आणि निःस्वार्थ सेवा पाहता, ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न, मिळण्यास पात्र आहेत, असे मला वाटते," असं खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनी पीटीआयशी संवाद साधताना म्हटलं.
9/9
भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना भारतरत्न मिळाला आहे?
मोदींना भारतरत्न देण्याची मागणी होत असतानाच हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की यापूर्वी 9 पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. पंडित जवाहरलाल नेहरू (1955), लाल बहादूर शास्त्री (1966), इंदिरा गांधी(1971), मोरारजी देसाई (1991), राजीव गांधी (1991), गुलझारीलाल नंदा (1997), अटल बिहारी वाजपेयी (2015), चौधरी चरण सिंग (2024) आणि पी. व्ही. नरसिंह राव (2024) या 9 पंतप्रधानांना आतापर्यंत 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं आहे.