• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /'शाहरुख खान दिवसाला 80 सिगारेट फुकतो तरी...', ज्येष्ठ अभिनेत्याने उलगडलं रहस्य

'शाहरुख खान दिवसाला 80 सिगारेट फुकतो तरी...', ज्येष्ठ अभिनेत्याने उलगडलं रहस्य

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 27, 2026, 21:23 IST|Updated: Nov 27, 2026, 21:27 IST
joinshare
ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी शाहरुख खानसंदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत.

'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शाहरुख खानच्या ऊर्जेचं कौतुक केलं आहे.

Shahrukh Khan 1/8

रझा मुराद यांच्याकडून शाहरुखचं कौतुक

ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खानच्या अफाट ऊर्जेचे आणि मेहनतीचे कौतुक केलं आहे. दीर्घकाळ चित्रीकरण केल्यानंतरही शाहरुख खान ज्या प्रकारे सक्रिय राहतो, ते पाहून आपण थक्क होतो असं त्यांनी सांगितलं आहे.
Shahrukh Khan 2/8

'मानवी डायनॅमो'

'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत रझा मुराद यांनी सांगितलं की, "शाहरुख खानकडे प्रचंड प्रतिभ आहे. त्याच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे. जेव्हा तो काम करतो, तेव्हा तो जणू एक 'मानवी डायनॅमो' (सतत कार्यरत राहणारी ऊर्जा) असतो".
Shahrukh Khan3/8

दिवसाला 80 सिगारेट ओढतो

यावेळी त्यांनी शाहरुख खान दिवसाला 80 सिगारेट ओढतो असाही खुलासा केला.
Shahrukh Khan4/8

तो इतका उत्साही कसा काय राहू शकतो..

ते म्हणाले की, "मला हेच समजत नाही की, दिवसाला 80 सिगारेट ओढण्यासारखी आरोग्यासाठी अत्यंत घातक सवय असूनही, तो इतका उत्साही कसा काय राहू शकतो?"
Shahrukh Khan5/8

अमिताभ बच्चन यांच्याशी केली तुलना

या ज्येष्ठ अभिनेत्याने शाहरुख खानच्या ऊर्जेची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली आणि म्हटले की, त्यांच्यासारखी व्यक्ती त्यांनी फार क्वचितच पाहिली आहे. रझा मुराद यांच्या मते, इतक्या ऊर्जेसह काम करण्याची क्षमता ही एक विशेष देणगी आहे.
Shahrukh Khan6/8

'ही एक नैसर्गिक गोष्ट'

"तो इतकी ऊर्जा कुठून आणतो? मी असं काही कधी पाहिलेले नाही. अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त, मला अजून असा दुसरा कोणताही अभिनेता भेटलेला नाही ज्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा असेल. मला वाटते की ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, देवाने दिलेली देणगी आहे. मी इतर कोणामध्येही इतकी ऊर्जा पाहिलेली नाही," असे ते म्हणाले.
Shahrukh Khan7/8

सध्याच्या पिढीत रणवीर सिंग

जेव्हा त्यांना सध्याच्या पिढीतील एखाद्या अभिनेत्यामध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यासारखा सुपरस्टार बनण्याची क्षमता आहे का? असं विचारलं असता त्यांनी 'रणवीर सिंग' असं उत्तर दिलं.
Shahrukh Khan8/8

शाहरुखने आता सोडली सिगारेट

शाहरुख खानने यापूर्वी आपल्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. २०२४ मध्ये आपल्या 59 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने सांगितले की, त्याने अखेर धूम्रपान सोडले आहे. शाहरुखने सांगितले की, धूम्रपान सोडूनही त्याला अजूनही श्वास घेण्यास त्रास होतो. धूम्रपान सोडल्यानंतर श्वास घेण्याची प्रक्रिया लवकर सुधारेल अशी त्याला अपेक्षा होती, परंतु या सवयीचे काही परिणाम अजूनही त्याला त्रास देत आहेत. मात्र, काळानुसार आपल्या आरोग्यात सुधारणा होईल, अशी आशा शाहरुखने व्यक्त केली आहे.
TAGS:
Shah Rukh Khan
Entertainment News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.