• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /RBI ची सर्वात मोठी कारवाई: एका झटक्यात 63 वित्त कंपन्यांचे परवाने रद्द, वाचा संपूर्ण यादी

RBI ची सर्वात मोठी कारवाई: एका झटक्यात 63 वित्त कंपन्यांचे परवाने रद्द, वाचा संपूर्ण यादी

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 16, 2026, 17:16 IST|Updated: Nov 16, 2026, 17:25 IST
joinshare
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 49 एनबीएफसीचे (Non-Banking Financial Company) परवाने रद्द केल्याची माहिती दिली आहे.

तसंच 13 एनबीएफसी आणि एका गृहनिर्माण वित्त कंपनीने (housing finance company) स्वेच्छेने आपली नोंदणी परत केली आहे.

RBI cancels license of 63 finance companies 1/9

आरबीआयचा 63 वित्त कंपन्यां मोठा झटका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने (RBI) एकाच वेळी 63 वित्त कंपन्यां मोठा झटका दिला आहे. आरबीआयने 49 एनबीएफसी (Non-Banking Financial Company) चे परवाने रद्द केली आहेत.
RBI cancels license of 63 finance companies 2/9

आरबीआयकडून अधिसूचना

आरबीआयने 16 नोव्हेंबरला यासंदर्भातील अधिसूचना काढत ही माहिती दिली आहे, हे आदेश 1 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत देण्यात आले होते. याव्यतिरिक्त, इतर 13 एनबीएफसी आणि एका गृहनिर्माण वित्त कंपनीने (housing finance company) स्वतःहून आपले परवाने परत केले आहेत.
RBI cancels license of 63 finance companies 3/9

आरबीआय कलम, 1934 अंतर्गत कारवाई

ही कारवाई 'आरबीआय कलम, 1934' (RBI Act, 1934) मधील तरतुदींनुसार करण्यात आली आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो: नेमक्या कोणत्या कारणांमुळे या 63 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले? तर जाणून घ्या
RBI cancels license of 63 finance companies 4/9

परवाने रद्द का करण्यात आले?

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मते, 14 कंपन्यांनी विविध कारणांमुळे स्वेच्छेने आपली नोंदणी परत केली. यापैकी सहा कंपन्यांनी आपला एनबीएफसीसंदर्भातील (NBFC) कामकाज पूर्णपणे बंद केलं होतं. याव्यतिरिक्त, पाच कंपन्यांना आता नोंदणीची आवश्यकता उरली नव्हती. तसंच, तीन कंपन्यांचे विलीनीकरण झाले किंवा इतर कारणांमुळे त्या बंद झाल्या, परिणामी त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली.
RBI cancels license of 63 finance companies 5/9

आता या कंपन्या कोणत्या प्रकारची कामे करू शकतात?

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, ज्या कंपनीची नोंदणी रद्द झाली आहे, ती आता एनबीएफसी (NBFC) म्हणून काम करू शकत नाही. याचा अर्थ असा की, अशा कंपन्यांना आता कर्ज देणे किंवा वित्त क्षेत्राशी संबंधित इतर कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी नाही.
RBI cancels license of 63 finance companies 6/9

आरबीआय (RBI) नोंदणी कधी रद्द करते?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, आरबीआय नेमक्या कोणत्या परिस्थितीत कंपन्यांची नोंदणी रद्द करते? याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा कंपन्या नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरतात, विहित अटी पूर्ण करत नाहीत किंवा आपला व्यवसाय बंद करतात.
RBI cancels license of 63 finance companies 7/9

नोंदणी रद्द करण्यात आलेल्या कंपन्या कोणत्या?

1) मनिभवनाम होम फायनान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 2) सन सोर्स लीफिन प्रायव्हेट लिमिटेड 3) लिअनार डिस्ट्रिब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड
RBI cancels license of 63 finance companies 8/9

ज्यांनी स्वतःहून आपले परवाने परत केले आहेत, त्यामध्ये खालील कंपन्यांचा समावेश

1) अमर प्लाझा अँड होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड 2) विकोनिक व्यापार प्रायव्हेट लिमिटेड 3) सीजीआर मर्कंटाईल फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड 4) ब्राव्हो कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 5) मनीष सिंथेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड 6) राईट ट्राजन फायनान्स अँड लीजिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड
RBI cancels license of 63 finance companies 9/9

सर्वसामान्यांसाठी महत्वाचे

जर तुम्ही एखाद्या एनबीएफसी (NBFC) कडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर ती कंपनी आरबीआय (RBI) कडे नोंदणीकृत आहे की नाही, याची खात्री करून घ्या. कोणत्याही अनोळखी वित्त कंपनीच्या व्यवहारांत पडू नका. लक्षात ठेवा की, जर तुम्ही एखाद्या एनबीएफसीसोबत आर्थिक व्यवहार करत असाल, तर त्या कंपनीची नोंदणी स्थिती तपासण्यासाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट द्या.
TAGS:
RBI

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
NBCC न्यायालयापेक्षा मोठं झालंय का? न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही सरोजिनी नगरमधील सदनिकांचा लिलाव सुरू

NBCC न्यायालयापेक्षा मोठं झालंय का? न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही सरोजिनी नगरमधील सदनिकांचा लिलाव सुरू

2

'मफलरवाले नेते फडणवीस', रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

3

मफलरवाला नेता कोण? रोहित पवार यांनी अखेर फोटोसहित नेत्याचे नाव जाहीर केले; फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र आश्चर्यचकित

4

रोहित पवार यांनी 2 बड्या नेत्यांची नावे घेतली; पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा

5

'तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, तुमच्यात प्रामाणिकपणा नाही,' वकिलाची थेट सरन्यायाधीशांसमोर टिप्पणी, पुढे घडलं असं काही...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.