रिअल इस्टेटमध्ये कायम भरभराट असते असं मानलं जातं. मात्र नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीमध्ये देशातील नऊ शहरांमधील घरांच्या विक्रीलाच घरघर लागल्याचं दिसत असून यामध्ये महाराष्ट्रातील तीन प्रमुख शहरांचा समावेश आहे. ही शहरे कोणती आणि इथे काय स्थिती आहे पाहूयात...
रिअल इस्टेटमध्ये एक वेगळाच ट्रेण्ड देशात दिसून येत असून महाराष्ट्रातील प्रमुख शहरामध्ये घरांची मागणी कमी झाल्याचं दिसून येत आहे. नेमकी मागणी कमी झालेली ही शहरं कोणती आणि याचा कोणत्या एका शहरावर परिणाम झालेला नाही ते पाहूयात...
1/7
घरांची मागणी कमी झाली
भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरांची मागणी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारतातील प्रमुख 9 शहरांमधील घरांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 6 टक्क्यांची घट झाली आहे.
2/7
9 शहरांमधील घरांची मागणी 1.03 लाख युनिट्सवर
'प्रॉपइक्विटी'च्या (PropEquity) आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख 9 शहरांमधील घरांची मागणी 1.03 लाख युनिट्सवर आली आहे. नवीन प्रकल्पांच्या लाँचिंगमध्ये अधिक मोठी घट झाल्यामुळे, या तिमाहीत विकल्या गेलेल्या घरांच्या तुलनेत बिल्डर्सने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिलेल्या घरांची संख्या कमी राहिली.
3/7
घरांच्या पुरवठ्यामध्ये 15 टक्क्यांनी घट
तिसऱ्या तिमाहीत (Q3 2026) नवीन घरांचा पुरवठा 15 टक्क्यांनी कमी झाला आहे. या पुरवठा आता 98,165 युनिट्सवर आला आहे. मागील तिमाहीमध्ये हा साठा 1.15 लाख युनिट्स इतका होता. मात्र या तुलनेमध्ये विक्री कमी झाली आहे, म्हणजेच चार टक्क्यांची घट होऊन विक्री 1.03 लाख युनिट्सवर स्थिरावली आहे. परिणामी, नवीन पुरवठ्यापेक्षा घरांची विक्री सुमारे पाच हजार युनिट्सने अधिक राहिली.
4/7
इन्व्हेंटरीबद्दल बिल्डर्स अधिक सावध
घरांच्या विक्रीची मागणी तिमाही आधारावर एक लाख युनिट्सच्या वर कायम असूनही, नवीन घरांचा साठा (इन्व्हेंटरी) वाढवण्याबाबत बिल्डर्स अधिक सावध झाले असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
5/7
महाराष्ट्रातील या शहरांमध्ये घरांची विक्री झाली कमी
एकूण विक्रीमध्ये घट झालेल्या शहरांमध्ये चेन्नई आणि कोलकाता ही शहरे आघाडीवर आहेत. या दोन्ही शहरांमध्ये विक्रीत वार्षिक आधारावर 17 टक्क्यांची घट झाली. त्यानंतर पुणे (16 टक्के), ठाणे (11 टक्के) आणि मुंबई (8 टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो.
6/7
महाराष्ट्रातील या शहरात 12 टक्क्यांची वाढ
याउलट, महाराष्ट्रात केवळ एकाच शहरात घरांची विक्री वाढली आहे. नवी मुंबईत घरांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 12 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली, तर हैदराबादमध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली. बेंगळुरूमध्ये विक्रीत एक टक्क्याने वाढ होऊन ती बऱ्यापैकी स्थिर राहिली. नवी मुंबईत नवीन प्रकल्पांच्या लाँचमध्ये वार्षिक स्तरावर 25 टक्क्यांची घट दिसून आली.
7/7
या शहरामध्ये 68 टक्क्यांची वाढ
मात्र, हैदराबादमध्ये पुरवठा आणि मागणी यांच्यात मोठी तफावत दिसून आली. तिथे नवीन प्रकल्पांच्या लाँचिंगमध्ये वार्षिक आधारावर 68 टक्क्यांची वाढ होऊन ती 22,090 युनिट्सवर पोहोचली, तर विक्रीत 11 टक्क्यांची वाढ होऊन ती 15,470 युनिट्सवर आली. परिणामी, या शहरात नवीन पुरवठा हा तिमाही विक्रीच्या तुलनेत अधिक राहिला. (सर्व फोटो प्रातिनिधिक)