• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /1 नोव्हेंबर पासून देशात काय बदललं? LPG च्या किंमतींसह PNB च्या नियमांपर्यंत, जाणून घ्या आजपासून लागू झालेले बदल

1 नोव्हेंबर पासून देशात काय बदललं? LPG च्या किंमतींसह PNB च्या नियमांपर्यंत, जाणून घ्या आजपासून लागू झालेले बदल

Reported Bypooja pawar
Published: Nov 01, 2026, 01:18 PM IST|Updated: Nov 01, 2026, 01:28 PM IST
joinshare

दर महिन्याच्या 1 तारखेपासून काही नियमांमध्ये बदल केले जात असतात. यावेळी 1 नोव्हेंबर 2026 पासून सुद्धा काही गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल तुमच्या वैयक्तिक आर्थिकबाबींशी संबंधित आहेत. ज्यामध्ये 1 नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत झालेली वाढ आणि पीएनबी क्रेडिट कार्डवरील नवीन शुल्कांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, इंडसइंड बँकेतील अयशस्वी व्यवहारांवरील शुल्क, करदात्यांसाठीच्या अंतिम मुदती आणि पेन्शनधारकांसाठी आवश्यक असलेल्या हयात दाखल्याचे प्रमाणपत्र इत्यादींशी  संबंधीचे अपडेट्सही यात आहेत. तेव्हा 1 नोव्हेंबर 2026 पासून देशात कोणते बदल झाले याविषयी जाणून घेऊयात. 

LPG Gas 1/6

LPG सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ :

1 नोव्हेंबर 2026 पासून 19 किलो ग्राम वजनाच्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांची वाढ झाली आहे. या किंमती वाढून 2,820 रुपये झाल्या असून मुंबई आणि चेन्नईमध्ये सुद्धा व्यावसायिक सिलेंडर 10 रुपयांनी महागले आहेत. मुंबईत एका सिलिंडरची नवीन किंमत 2,774.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये किमतीत वाढ झाल्यामुळे तिथे एका सिलिंडरची किंमत 2,964 रुपये झाली आहे. किंमतीतील या वाढीचा परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि केटरिंग व्यवसायांवर होण्याची शक्यता आहे. मात्र घरगुती एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कारण 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
ITR 2/6

पेन्शनधारकांसाठी आवश्यक असलेल्या हयात दाखल्याचे प्रमाणपत्र :

जर तुमच्या घरी वडीलधाऱ्या व्यक्ती असती आणि ते पेन्शन घेत असतील तर 80 वर्षांखालील पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला (लाईफ सर्टिफिकेट) सबमिट करण्याचा कालावधी 1 नोव्हेंबर 2026 पासून सुरू झाला आहे. 30 नोव्हेंबर 2026 ही हयातीचा दाखला जमा करण्याची अंतिम तारीख आहे. 1 ऑक्टोबर पासून पेन्शन धारकांचा हयातीचा दाखला स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. पेन्शनधारक आपापल्या बँक शाखेत जाऊन आपला हयातीचा दाखला (लाईफ सर्टिफिकेट) सादर करू शकतात. जर तुम्हाला बँकेत जायचे नसेल, तर तुम्ही ते डिजिटल पद्धतीनेही सादर करू शकता.
ITR 3/6

टॅक्स ऑडिटवाल्या टॅक्स पेअर्सना मिळणार वेळ :

ITR भरणाऱ्या काही करदात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या करदात्यांना कर टॅक्स ऑडिटची आवश्यकता असते, अशा करदात्यांसाठी निर्धारण वर्ष2026-27 करिता आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर ही मूळ अंतिम मुदत आता 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सवलत अशा व्यावसायिक व्यक्ती, संस्था आणि इतर करदात्यांना उपलब्ध असेल ज्यांनी 21 ऑक्टोबर 2026 पर्यंत आपले कर लेखापरीक्षण अहवाल सादर केले आहेत. जर तुम्हीही या श्रेणीत येत असाल तर तुमच्याकडे टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पुरेसा वेळ आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.
GST Rules 4/6

GST च्या नियमांमध्ये बदल :

सरकारने CGST कायदा 2017 अंतर्गत काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे. हे नियम 1 नोव्हेंबर, 2026 पासून लागू झाले आहेत. हे बदल प्रामुख्याने पुरवठ्यानंतर दिली जाणारी सवलत, क्रेडिट नोट्स आणि GST परताव्याशी संबंधित आहेत. नवीन नियमांनुसार, विक्री पश्चात सवलतींना करपात्र मूल्यातून वगळण्यासाठीचे निकष अधिक कठोर करण्यात आले आहेत. अशा सवलतींशी संबंधित इनपुट टॅक्स क्रेडिट परत करणे व्यवसायांसाठी अनिवार्य असेल.
Induslnd Bank 5/6

इंडसइंड बँकेतील नियम :

इंडसइंड बँकेतील वेगवेगळ्या प्रकारच्या अकाउंटवर आज वेगवेगळे चार्जेस लागू करण्यात येणार आहेत. जर खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे POS व्यवहार अयशस्वी झाला, तर बँक आता तुमच्याकडून 25 रुपये शुल्क आकारेल. त्याचप्रमाणे, इंडसइंड बँकेच्या ATM वर अपुऱ्या निधीमुळे व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपयांचा दंड आकारला जाईल. याव्यतिरिक्त, जर एखादा चेक बाऊन्स झाला किंवा आर्थिक कारणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव परत आला तर प्रति चेक 50 रुपये शुल्क आकारले जाईल.
PNB Credit Card 6/6

PNB ने क्रेडिट कार्डवर वाढले चार्जेस :

PNB क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 1 नोव्हेंबरपासून अनेक सेवा शुल्कांमध्ये वाढ झाली आहे. हा बदल Visa आणि RuPay अशा दोन्ही प्रकारच्या कार्डांसाठी लागू आहे. जर तुम्ही PNB ATM मधून क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम काढली, तर आता तुम्हाला काढलेल्या रकमेच्या 2.5% किंवा 400 इतके चार्जेस आकारले जाईल. मात्र जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या ATM मधून रोख रक्कम काढली, तर हे शुल्क काढलेल्या रकमेच्या 2.5% किंवा 500 रुपये इतके असेल. विलंब शुल्काबाबत सांगायचे तर यापूर्वी 1,000 रुपयांपर्यंतच्या थकीत रकमेवर कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते तर 10,000 रुपयांपेक्षा जास्त थकीत रकमेवर जास्तीत जास्त 750 रुपयांचे शुल्क आकारले जात असे. मात्र आता 500 रुपयांपर्यंतच्या थकीत रकमेवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 50,000 रुपयांपेक्षा जास्त थकीत रकमेच्या बाबतीत विलंब शुल्क जास्तीत जास्त 1,200 रुपयांपर्यंत असू शकते.
TAGS:
LPG Gas Price
Marathi News
india

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता! हिंगोलीतून काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य, 1972 नंतरचं पहिल्यांदाच घडलं!

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता! हिंगोलीतून काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य, 1972 नंतरचं पहिल्यांदाच घडलं!

2

550 भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्...लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं

3

आजपासून बदललाय मोबाईल कॉलिंगसंदर्भातील नियम, तुमच्यावर काय परिणाम? जाणून घ्या

4

लोकल ट्रेनमध्ये 'तो' तरुण..., कॉलेज तरुणीचा अश्लील VIDEO इन्स्टावर, काय आहे नेमकं प्रकरण?

5

'मी तुला माझ्या पत्नी सोबत...', LIVE मॅचमध्ये स्टार क्रिकेटरला मिळाली अश्लील ऑफर, Video Viral

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.