भारताचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे तर भारतामध्ये रणजी ट्रॅाफीचे सामने खेळवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी भारताच्या संघासाठी कसोटीमध्ये पदार्पण करणारा सांरांश जैनने पुन्हा एकदा त्याची कमाली दाखवली आहे.
रणजी ट्रॅाफीमध्ये सारांश जैनची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
1/8
Saransh Jain Ranji Trophy Round 3 Day 1
होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे सारांश जैनच्या नावावर होता. त्याने 13 षटकांत केवळ 40 धावा दिल्या आणि 7 बळी घेतले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
Saransh Jain Ranji Trophy Round 3 Day 1
2026-27 रणजी ट्रॉफीमध्ये सर्व संघ आपला तिसरा सामना खेळत आहेत. होळकर स्टेडियमवर मध्य प्रदेशचा सामना बिहारशी होत आहे. बिहारचा कर्णधार साकिबुल गनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय व्यर्थ ठरला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
Saransh Jain Ranji Trophy Round 3 Day 1
दुसऱ्या टोकाचे फलंदाज सतत बाद होत होते. मंगल व्यतिरिक्त, खालच्या फळीत सूरज कश्यपने केवळ 15 धावांचे योगदान दिले. या दोघांना वगळता, बिहारची संपूर्ण फलंदाजी फळी अपयशी ठरली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
Saransh Jain Ranji Trophy Round 3 Day 1
दरम्यान, बिहारच्या फलंदाजीत केवळ दोनच खेळाडूंनी दुहेरी आकडा गाठला. सलामीवीर मंगल महारौरने 87 चेंडूंमध्ये 42 धावा करून बिहारसाठी सर्वाधिक धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
Saransh Jain Ranji Trophy Round 3 Day 1
सारांशच्या भेदक गोलंदाजीसमोर बिहारचा संपूर्ण संघ पत्त्यांच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळला. सारांशशिवाय, मध्य प्रदेशकडून आवेश खानने दोन, तर कुमार कार्तिकेयने एक बळी घेतला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
Saransh Jain Ranji Trophy Round 3 Day 1
तिसऱ्या फेरीच्या सामन्यात, सारांशने बिहारविरुद्ध मध्य प्रदेशकडून एकहाती सात बळी घेतले. सारांशने या डावात 13 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 40 धावा दिल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
Saransh Jain Ranji Trophy Round 3 Day 1
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये सारांश जैनला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. आता तो रणजी ट्रॉफीमध्ये चर्चेत आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
Saransh Jain Ranji Trophy Round 3 Day 1
बिहारचा संघ 99 धावांवर सर्वबाद झाला, आणि रणजी ट्रॉफीमध्ये 100 धावांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरण्याची ही बिहारची चौथी वेळ ठरली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया