• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /पुण्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही तासातच शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

पुण्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही तासातच शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 05, 2026, 09:27 AM IST|Updated: Nov 05, 2026, 09:42 AM IST
joinshare
शरद पवारांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे. 

Sharad Pawar Hospital1/8

शरद पवार मुंबईतील रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) प्रमुख शरद पवार यांना बुधवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Sharad Pawar Hospital2/8

सुप्रिया सुळेंची पोस्ट

सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून शरद पवारांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र डिस्चार्जनंतर लगेचच पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने अनेकजण चिंता व्यक्त करत होते.
Sharad Pawar Hospital3/8

वैद्यकीय चाचण्यांसाठी दाखल

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये पुढील वैद्यकीय चाचण्यांसाठी शरद पवारांना दाखल केल्याची माहिती पोस्टमध्ये दिली आहे.
Sharad Pawar Hospital4/8

2 नोव्हेंबरला रुग्णालयात केलं होतं दाखल

याआधी, 85 वर्षीय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील 'रुबी हॉल क्लिनिक'मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. खोकला आणि छातीत वेदना (प्ल्युरिटिक पेन) जाणवल्यामुळे त्यांना 2 नोव्हेंबर रोजी तिथे दाखल करण्यात आले होते. पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले असताना, सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते की, त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Sharad Pawar Hospital5/8

नरेंद्र मोदींनी फोनवरुन केली चौकशी

दरम्यान, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, अशी माहिती त्यांच्या एका सहकाऱ्याने दिली. पंतप्रधानांनी शरद पवार यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, असे त्यांचे सहकारी विठ्ठल मणियार यांनी सांगितले.
Sharad Pawar Hospital6/8

'सुप्रिया आता पूर्णपणे सज्ज आहेत'

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पवार साहेबांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी अत्यंत आपुलकीने व आदराने संवाद साधत, पवार साहेबांना पूर्ण विश्रांती घेण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदींनी त्यांना सांगितले की, सुप्रिया आता पूर्णपणे सज्ज आहेत आणि त्या इतर सहकाऱ्यांसोबत देशाची जबाबदारी सांभाळतील, त्यामुळे पवार साहेबांनी आता विश्रांती घ्यावी," असे मणियार यांनी पत्रकारांना सांगितले.
Sharad Pawar Hospital7/8

पवारांनी मानले मोदींचे आभार

पवार साहेबांनी प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले, असेही त्यांनी सांगितले. "पवार साहेबांनी पंतप्रधानांना सांगितले की, ते विश्रांती घेत आहेत आणि देशाला काहीही काळजी करण्याचे कारण नाही, कारण सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी सर्वजण इथे आहोत. त्यांनी आपली विचारपूस केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले," असे त्यांच्या सहाय्यकाने सांगितले.
Sharad Pawar Hospital8/8

डॉक्टरांनी काय सांगितलं होतं?

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोग तज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ के. ग्रँट यांनी सांगितले की, छातीत वेदना (प्ल्युरिटिक पेन) होत असल्याच्या तक्रारीनंतर, पवार यांना सर्वसाधारण तपासणी आणि वैद्यकीय निरीक्षणासाठी दाखल करण्यात आले होते. 'प्ल्युरिटिक पेन' म्हणजे छातीत होणारी अशी वेदना, जी सहसा श्वास घेताना, खोकताना किंवा शिंकताना अधिक तीव्र होते.
TAGS:
Sharad Pawar
Supriya Sule

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
सर्व चाचण्या उत्तीर्ण पण डोळ्यांत तिरळेपणा म्हणून पोलीस भरतीतून बाहेर काढलं; SC चा निर्णय उमेदवारांच्या कामाचा!

सर्व चाचण्या उत्तीर्ण पण डोळ्यांत तिरळेपणा म्हणून पोलीस भरतीतून बाहेर काढलं; SC चा निर्णय उमेदवारांच्या कामाचा!

2

ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

3

मुंबईच्या लेकाने रणजी ट्रॉफीत पाडला धावांचा पाऊस! 400 धावांचा पराक्रम, कोण आहे चिन्मय सुतार?

4

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महामंडळाकडून दिवाळी बोनस जाहीर; प्रताप सरनाईकांची घोषणा

5

प्रायव्हेट फोटो, विवस्त्र डान्स, अंगभर लिपस्टिक अन् तासंतास...; शिवा शर्मा ठरला श्रद्धाच्या क्रूरतेचा बळी, धक्कादायक खुलासे समोर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.