• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /शीतल देवीची सुवर्ण कामगिरी! दमदार कमबॅक करत गोल्ड मेडल केलं नावावर...

शीतल देवीची सुवर्ण कामगिरी! दमदार कमबॅक करत गोल्ड मेडल केलं नावावर...

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 22, 2026, 05:26 PM IST|Updated: Oct 22, 2026, 05:39 PM IST
joinshare
जपानमध्ये सध्या आशियाई पॅरा खेळ सुरु आहेत, यामध्ये भारताने कमालीची कामगिरी आतापर्यत केली आहे.

चौथ्या दिवशी आता तिंरजादीमध्ये देखील भारताची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली आहे. 

Sheetal Devi Gold Medal1/8

Sheetal Devi Gold Medal

दबावाखाली अलीमची कामगिरी काहीशी कमकुवत होती. तिने आपल्या शेवटच्या तीन बाणांनी 9, 8 आणि 9 गुण मिळवले. त्यामुळे, ती अंतिम फेरीत केवळ २६ गुणच मिळवू शकली आणि शीतलने १४२-१३९ गुणांनी सुवर्णपदक जिंकले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Sheetal Devi Gold Medal2/8

Sheetal Devi Gold Medal

विश्वविजेती शीतलने 2023 मध्ये हांगझू येथे झालेल्या मागील आशियाई पॅरा गेम्सच्या अंतिम फेरीत अलीमला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. यावेळीही, या दोन तिरंदाजांमध्ये विजेतेपदासाठी सामना झाला, ज्यात भारतीय खेळाडूने दबावाखाली आपला संयम राखला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Sheetal Devi Gold Medal3/8

Sheetal Devi Gold Medal

हातांशिवाय जन्मलेल्या 19 वर्षीय शीतलने गुरुवारी महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकाराच्या अंतिम सामन्यात सिंगापूरच्या अलीम नूर शहिदाला 142-139 ने पराभूत करून आपले सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, शीतलने पिछाडीवरून एक उल्लेखनीय पुनरागमन करत हा सामना जिंकला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Sheetal Devi Gold Medal4/8

Sheetal Devi Gold Medal

भारताची स्टार तिरंदाज शीतल देवीने आशियाई पॅरा गेम्समध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवले होते, हे स्वप्न तिने आजच्या फायनलच्या सामन्यामध्ये पूर्ण केले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Sheetal Devi Gold Medal5/8

Sheetal Devi Gold Medal

भारताच्या अखेरीस, त्यांनी 38 गुण मिळवून 151-148 असा सामना जिंकला आणि सुवर्णपदक पटकावले. उपांत्य फेरीत शीतल आणि तोमन यांनी चायनीज तैपेईच्या युन-ह्सिएन ली आणि ज्युन-काई यांग यांचा पराभव केला होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Sheetal Devi Gold Medal6/8

Sheetal Devi Gold Medal

पहिल्या फेरीमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये शीतल देवी आणि तोमन कुमार यांनी 38-37 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत भारतीय खेळाडूंनी आपली ताकद दाखवत गुणसंख्या ३९ पर्यंत नेली, ज्यामुळे भारताला 77-73 अशी भक्कम आघाडी मिळाली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Sheetal Devi Gold Medal7/8

Sheetal Devi Gold Medal

भारत आणि इंडोनेशिया दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दोन्ही भारतीय खेळाडूंनी शेवटपर्यंत आपला संयम राखला आणि सुवर्णपदक जिंकले. यासह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 16 झाली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Sheetal Devi Gold Medal8/8

Sheetal Devi Gold Medal

भारतीय जोडीने पॅरा कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये शीतल देवी आणि तोमन कुमार यांनी भारतासाठी सुवर्णपदक मिळवले आहे. त्यांनी फायनलच्या सामन्यामध्ये इंडोनेशियाला पराभूत करुन गोल्ड मेडल नावावर केले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Asian Games
Marathi News
Sports News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.