प्रशांत महासागरातील एल निनो सध्या सर्वोच्च पातळीजवळ पोहोचत आहे.
डिसेंबरमध्येच तापमान वाढ होत असून त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्यता आहे.
1/8
एल निनो सर्वोच्च पातळीवर पोहोचणार, पुढचा महिना जगासाठी महत्त्वाचा ठरणार, प्रशांत महासागरात...
डिसेंबरमध्ये प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा 3.07 अंश सेल्सिअस अधिक नोंदले जाऊ शकते, असा अंदाज अमेरिकी हवामानशास्त्र संस्था 'नोआ'च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) जाहीर केला आहे.
2/8
प्रशांत महासागराचे तापमान
फेब्रुवारीपासून प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्यावर दोन अंशापर्यंत येण्याचा अंदाज असून, पुढील वर्षी जूनमध्ये न्यूट्रल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आता 75 टक्के झाली आहे, असे 'सीपीसी'च्या अंदाजात म्हटले आहे.
3/8
4.4 अंशांनी जास्त
सीपीसी'ने दिलेल्या माहितीनुसार, विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पूर्व भागाचे तापमान सध्या सरासरीपेक्षा 4.4 अंशांनी जास्त नोंदले जात आहे.
4/8
एल निनो विकसित
महासागरात विक्रमी तीव्रतेचा (सरासरीपेक्षा 2.5 अंशापेक्षा जास्त तापमान) एल निनो विकसित होण्याची शक्यता गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झाली असून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये एल निनो सर्वोच्च पातळीवर पोचण्याची शक्यता 60 टक्के आहे.
5/8
70 टक्के
गेल्या महिन्यातील अंदाजात हीच शक्यता नोव्हेंबरसाठी सर्वाधिक 83 टक्के, तर डिसेंबरसाठी 70 टक्के वर्तविण्यात आली होती.
6/8
2027 पर्यंत तीव्र
त्यानंतर फेब्रुवारी 2027 पर्यंत तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता 79 टक्के आहे.
7/8
प्रशांत महासागराचे तापमान
सीपीसी'च्या अंदाजानुसार, पुढील वर्षी मार्चमध्ये प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा 1.3 अंश, एप्रिलमध्ये 0.7 अंश, तर मेमध्ये सरासरीपेक्षा 0.3 अंश जास्त नोंदले जाण्याची शक्यता आहे.
8/8
न्यूट्रल स्थिती
सरासरीपेक्षा 0.5 अंशांच्या दरम्यान तापमान आल्यामुळे मे महिन्यात न्यूट्रल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, जुलैपर्यंत तेथील तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.