भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाचा हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. यापूर्वी असं 2002 मध्ये झालं होतं. याबद्दलच जाणून घेऊयात...
या नव्या वर्षातील अवघ्या 12 महिन्यांच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयालात 2002 नंतर पहिल्यांदाच असं होणार आहे. जाणून घ्या सविस्तरपणे...
1/10
2002 नंतर तब्बल 27 वर्षानंतर हा योग जुळून येणार
पुढलं वर्ष सर्वोच्च न्यायालयासाठी फार खास असणार आहे. नेमकं काय घडणार आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
2/10
सर्वोच्च न्यायालयाला चार सरन्यायाधीश
भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात 2027 हे वर्ष एका दुर्मिळ ठरणार आहे. या नव्या वर्षातील अवघ्या 12 महिन्यांच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाला चार सरन्यायाधीश मिळणार आहेत.
3/10
पहिली महिला सरन्यायाधीश
तब्बल पाव शतकानंतर देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेत प्रथमच असा योग जुळून येणार आहे. यापूर्वी 2002 मध्ये चार सरन्यायाधीशांनी पदभार सांभाळला होता. विशेष म्हणजे देशाला पहिली महिला सरन्यायाधीशही मिळणार आहे.
4/10
सरन्यायाधीशांची निवड कोण करतं?
सुस्थापित परंपरेनुसार सरन्यायाधीशांची निवड ही सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम ठरवते व त्यात कोणाचाही हस्तक्षेप मान्य नसतो.
5/10
सूर्यकांत कधी निवृत्त होणार?
सध्या सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणारे सूर्यकांत 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठतेच्या परंपरेनुसार न्या. विक्रम नाथ यांच्याकडे सरन्यायाधीशपदाची सूत्रे सोपवली जातील.
6/10
सात महिने पदावर राहणार
न्या. विक्रम नाथ सप्टेंबर 2027 पर्यंत सुमारे सात महिने या पदावर राहतील. त्यांच्यानंतर न्या. बी. व्ही. नागरत्ना या देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होतील. अर्थात न्या. नागरत्ना 29 ऑक्टोबर 2027 रोजी निवृत्त होतील.
7/10
न्या. नागरत्ना यांच्यानंतर कोण?
न्या. नागरत्ना यांच्यानंतर 30 ऑक्टोबरपासून न्या. पी. एस. नरसिंहा जबाबदारी स्वीकारतील व ते मे 2028 पर्यंत या सर्वोच्च पदावर सरन्यायाधीशपदाची राहतील.
8/10
न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय 65 वर्षे असल्याने....
सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात 2002 मध्येही चार सरन्यायाधीश झाले होते. त्यानंतर आता 2027 मध्ये पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय 65 वर्षे असल्याने कार्यकाळही सरन्यायाधीशपदाचा त्यांच्या उर्वरित सेवाकाळावर अवलंबून असतो.
9/10
पहिल्या महिला सरन्यायाधीशांना अवघे 36 दिवस
न्या. नागरत्ना या भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश ठरणार आहेत. एका विद्वान महिलेकडे पूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व येण्याचा इतिहास त्यामुळे घडणार आहे.
10/10
भारतीय न्यायव्यवस्थेतील ऐतिहासिक टप्पा
मात्र, न्या. नागरत्ना यांना या ऐतिहासिक पदावर काम करण्यासाठी केवळ 36 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती केवळ न्यायव्यवस्थेतील नेतृत्वबदल म्हणून नव्हे तर भारतीय न्यायव्यवस्थेतील ऐतिहासिक टप्पा म्हणूनही महत्त्वाची ठरणार आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)