• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /भारतीयांना आता iPhone ही नकोसा! ग्राहकच नसल्याने रिटेलर्सकडे साठा पडून; आयफोनकडे पाठ फिरवण्याची कारणं कोणती? एकदा वाचाच

भारतीयांना आता iPhone ही नकोसा! ग्राहकच नसल्याने रिटेलर्सकडे साठा पडून; आयफोनकडे पाठ फिरवण्याची कारणं कोणती? एकदा वाचाच

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 28, 2026, 09:04 AM IST|Updated: Oct 28, 2026, 09:31 AM IST
joinshare
आयफोन हल्ली अनेकांकडे पाहायला मिळतो, असं अनेकदा चर्चेत सहज ऐकायला मिळणारं वाक्य तसं आपल्यासाठी नवं नाही. मात्र आता भारतीयांना आयफोनचा कंटाळा आलाय की काय? भारतीयांनी या फोनकडे पाठ फिरवलंय की काय अशी शंका उपस्थित करण्यासारखा प्रकार समोर आलाय. त्याबद्दलच...

आयफोनच्या विक्रीमध्ये भारतात सणासुदीदरम्यान मोठी घट झाल्याचं दिसून आलंय. असं नक्की का झालं आहे आणि यामागील कारणं काय ते पाहूयात...

iphonenews1/8

आयफोनला घरघर

आयफोनच्या विक्रीमध्ये भारतात तरी फार मोठी घट झाली आहे. प्रचंड क्रेझ असलेल्या या फोनकडे भारतीयांनी अचानक पाठ का फिरवलीये जाणून घेऊयात...
iphone2/8

अॅपलला भारतात मोठा फटका

ऐन सणासुदीच्या काळात जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल कंपनी अॅपलला भारतात मोठा फटका बसला आहे.
iphone3/8

जुन्या मॉडेल्सच्या भक्कम कामगिरीमुळे टिकून

जागतिक स्तरावर 'आयफोन ड्युओ'च्या आतील स्क्रीनला तडे जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, जुन्या मॉडेल्सच्या भक्कम कामगिरीमुळे दबदबा कायम आहे.
iphone4/8

बाजारपेठ संशोधन संस्थेनं जारी केली माहिती

अॅपलची ही घसरण चिंतेचा विषय ठरली आहे. बाजारपेठ संशोधन संस्था 'आयडीसी' आणि 'काउंटरपॉइंट' यांनी जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
iphone5/8

आयफोनच्या विक्रीत घट

किमतींमधील वाढ, नगण्य सवलती आणि नवीन फोन खरेदीतील ग्राहकांची अनास्था यामुळे भारतातील दसरा आणि दिवाळीच्या काळात आयफोनच्या विक्रीत तब्बल 30 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
iphone6/8

विक्रेत्यांकडे साठा पडून

'ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन' दिलेल्या माहितीनुसार, यंदा सणासुदीच्या काळात मोठ्या विक्रीच्या अपेक्षेने व्यापाऱ्यांनी आयफोन्सचा मोठा साठा करून ठेवला होता.
iphone7/8

रिटेलर्सच्या अंगाशी आला साठा

मात्र, किमतींमधील वाढ, नगण्य सवलतींमुळे मंदावलेल्या मागणी आता रिटेलर्सच्याच अंगाशी आली आहे. सणासुदीनिमित्त मागवलेला आयफोनचा हा साठा आता रिटेलर्सकडे पडून आहे.
iphone8/8

'आयफोन ड्युओ'ला मागणी

दुसरीकडे, 2.99 लाख रुपये किंमत असलेल्या नव्या 'आयफोन ड्युओ'च्या मागणीच्या तुलनेत नगण्य पुरवठ्यामुळे दुकानांमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत दुबईहून बेकायदेशीररीत्या फोन आयात करून ग्रे-मार्केटमध्ये विकल्याचा आरोप आहे.
TAGS:
Technology News
india

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.