मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांतील वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
मुंबईतील शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील तीन उड्डाणपुलांचे २२ ऑक्टोबर रोजी लोकार्पण होणार आहे.
1/11
तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण
मुंबईतील शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील तीन उड्डाणपुलांचे २२ ऑक्टोबर रोजी लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 1 वाजता व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण होणार आहे.
2/11
शीव रेल्वे उड्डाणपूल
शीव रेल्वे स्थानकाजवळील 112 वर्षे जुना आणि असुरक्षित ठरलेला पूल नव्याने बांधण्यात आला आहे. सीएसएमटी-कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठी महत्त्वाचा आहे.
3/11
चार महिने आधीच पूल पूर्ण
धारावी, वांद्रे, बीकेसी, कुर्ला आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा पूर्व-पश्चिम दुवा असून पुलाचे काम फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र चार महिने आधीच पूर्ण झाले.
4/11
लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान
रेल्वे मार्गिकांचा विस्तार झाल्यानंतर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होणार.
5/11
विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल
विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सुमारे 650 मीटर लांबीचा उड्डाणपूल, पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणार आहे.
6/11
प्रवासाचा वेळ 30 मिनिटांवरून 10 मिनिटांपर्यंत
यामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांवरून 10 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
7/11
रेल्वे स्थानकाचाही होणार कायापालट
रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्या, स्थानक मास्तर कार्यालय आणि जिन्यांचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे.
8/11
गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपूल
गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ 1.26 किलोमीटर लांबीचा, तीन अधिक तीन मार्गिकांचा उड्डाणपूल. जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ते दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोषनगरपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
9/11
कनेक्टिव्हिटी सुधारणार
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
10/11
गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील जुळ्या बोगद्यांच्या प्रकल्पासाठी महत्त्वाचा
दिंडोशी न्यायालय, रत्नागिरी हॉटेल जंक्शन आणि वालभट नदी चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील जुळ्या बोगद्यांच्या प्रकल्पासाठीही हा उड्डाणपूल महत्त्वाचा आहे.
11/11
मुंबईकरांना काय फायदा?
पूर्व-पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होईल. प्रमुख जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या पायाभूत सुविधांना चालना मिळेल. शीव आणि विद्याविहार परिसरातील वाहतुकीसह गोरेगाव पूर्वेतील कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.