अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात नवीन ट्विस्ट आलं आहे. हल्लेखोरांच्या टार्गेटवर टायगर नाहीतर बॉलिवूडमधील सिरीअल किसर होता.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे जातोय धक्कादायक खुलासे होतं आहेत. आता अशी माहिती हल्लेखोरांच्या टार्गेटवर टायगर नाहीतर बॉलिवूडमधील सिरीअल किसर होता.
1/8
सलमान खान आणि आमिर खानंच्या घराची रेकी
हिंदुस्तान टाइम्सने आपल्या अहवालात सांगितलं की क्राइम ब्रँचच्या सूत्रांनुसार सलमान खान आणि आमिर खानंच्या घराची रेकी केल्याचा खुलासा हल्लेखोऱ्यांनी केला आहे.
2/8
आमिर खानच्या घराची तीन वेळा रेकी
आमिर खानच्या घराची तीन वेळा रेकी करण्यात आली होती. पण आमिर खान शूटिंगसाठी बाहेर होता किंवा तो घराबाहेर पडलाच नाही. अशात आमिर खानचा काही ठावठिकाणा होत नसल्यामुळे हल्लेखोराला आमिरला टार्गेट करणे कठीण झाले होते.
3/8
इम्रान हाश्मी हा निशाणावर
एवढंच नाहीतर अभिनेता टायगर श्रॉफ हा हल्लेखोऱ्यांच्या टार्गेट करण्यापूर्वी बॉलिवूडमधील अभिनेता इम्रान हाश्मी हा निशाणावर होता.
4/8
इम्रान हाश्मीच्या घराची रेकी
सूत्रांनी माहिती दिली की, हल्लेखोऱ्यांना इम्रान हाश्मीच्या घराची रेकी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र इम्रान हाश्मीचे घर त्यांना सापडले नाहीत.
5/8
म्हणून हल्लेखोऱ्यांनी...
याच कारणामुळे हल्लेखोरांना इम्रान हाश्मीवर हल्ला करता आला नाही. त्यामुळे त्यानंतर त्यांनी टायगर श्रॉफवर निशाणा साधला.
6/8
मोठा खुलासा
सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे टायगर श्रॉफच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हल्लेखोरांना सोपे गेले, असा खुलासा त्यांनी चौकशीदरम्यान केला आहे.
7/8
शूटरांनी टायगर श्रॉफला लक्ष्य...
टायगर श्रॉफ हा दर रविवारी जुहूमधील पुष्पा नरसी मैदानावर फुटबॉल खेळायला जातो. त्यामुळे शूटरांनी टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला.
8/8
बॉलिवूडचा 'सिरीअल किसर'ही होता...
या प्रकरणात आरोपी प्रांजल आणि बिश्नोई गँगच्या संबंधांचाही तपास सुरू असूनअनिल पंडितला लॉरेन्स गँगचा कथित ऑपरेटिव्ह असल्याचे तपासात समोर आलं आहे.