उत्तर प्रदेशमध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार घडला असून यामध्ये 31 वर्षीय विवाहित पुरुषाने आपले प्राण गमावले आहेत. नेमकं झालं काय या तरुणासोबत जाणून घ्या सविस्तरपणे...
विस्कटलेल्या संसाराचा अत्यंत क्रूर अंत झाल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. नक्की झालं काय पाहूयात...
1/7
तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले पण...
सोसायटीतील रहिवाशांनी हर्षितला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हर्षितच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पत्नीसोबत सुरू असलेल्या वादामुळे तो मानसिक तणावाखाली होता. म्हणून तो एकटाच राहत होता.
2/7
पत्नी त्याच्या फ्लॅटवर आली आणि...
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी हर्षितची पत्नी त्याच्या फ्लॅटवर आली आणि तिने दरवाजा ठोठावला. मात्र, पुन्हा वाद होईल या भीतीने हर्षितने दरवाजा उघडण्यास नकार दिला. पत्नीने त्याला बाहेर येण्यास सांगितले आणि बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु हर्षितने प्रतिसाद दिला नाही.
3/7
भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता
2024 मध्ये विवाहबंधनात अडकलेला हर्षित लवनिया पत्नीसोबतच्या वादामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यापासून वेगळा राहत होता. तो एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता.
4/7
फ्लॅटच्या बाल्कनीतून खालच्या मजल्यावर उतरून
त्यानंतर हर्षितच्या पत्नीने दरवाजा उघडण्यासाठी सुरक्षा रक्षकांना (सिक्युरिटी) बोलावले. या दरम्यान, हर्षितने फ्लॅटच्या बाल्कनीतून खालच्या मजल्यावर उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाय घसरला आणि तो थेट खाली कोसळला, ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली.
5/7
नोएडामध्ये घडला विचित्र प्रकार
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे एक विचित्र घटना घडली आहे. पत्नीसोबत होणारा वाद टाळण्यासाठी फ्लॅटच्या बाल्कनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना, 31 वर्षीय तरुणाचा 21 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना ग्रेटर नोएडामधील 'सेंच्युरियन पार्क ट्रॉपिकल गार्डन सोसायटी'मध्ये घडली. (पुढील सर्व फोटो प्रातिनिधिक)
6/7
कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिस सध्या त्याच्या पत्नीची चौकशी करत असून सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.
7/7
पतीचा इमारतीवरुन पडून मृत्यू
एका विचित्र प्रकरणामध्ये पत्नीपासून लपताना पतीचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला आहे. नेमका हा सारा प्रकार काय जाणून घ्या....