भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित केलेल्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमधील बिहारच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बिहार क्रिकेट असोसिएशनने (BCA) शुक्रवारी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली.
युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये बिहारचे कर्णधारपद भूषवणार आहे. बीसीएने पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
1/8
बिहार रणजी ट्रॉफी संघ
निवड समितीचे अध्यक्ष हरविंदर सिंग आणि सदस्य अमिताभ विजयवर्गीय हे देखील संघाच्या सामन्यांवर देखरेख ठेवण्यासाठी इंदूरमध्ये उपस्थित राहतील. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा कधी सुरु होणार?
बिहार आपल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मोहिमेची सुरुवात 14 नोव्हेंबर रोजी इंदूरमध्ये होणाऱ्या पहिल्या दोन सामन्यांनी करेल. बिहारच्या रणजी ट्रॉफी संघाशी संबंधित सपोर्ट स्टाफ संपूर्ण स्पर्धेत संघासोबत राहील. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
स्टॅंडबाय खेळाडू
बिपिन सौरभ, सुमन कुमार, आकाश राज, खालिद आलम, अभिजीत साकेत, यशस्वी ऋषभ, लखन राजा, पवन कुमार, भास्कर दुबे, कुमार रजनीश, सुयश, अमित चौधरी, पीयूष सिंह, भानु कुमार, लोकेश बाबूलाल कुमार आणि प्रशांत श्रीवास्तव. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
बिहारचा संपूर्ण संघ
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आलोक कुमार, आयुष लोहारुका (विकेटकीपर), अल्तमश अशरफ, परम कुमार सिंह, अनमोल कुमार (विकेटकीपर), ऋत्विक राज, सूरज कश्यप (उपकर्णधार), मयंक कुमार, राघवेंद्र प्रताप, आशीष कुमार, वासुदेव प्रताप सिंह, मोहम्मद इजहार, आमोद यादव, प्रशांत सिंह, नवाज खान और हिमांशु सिंह. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
वैभव सूर्यवंशीची कर्णधार म्हणून नियुक्ती
बिहार संघाने 15 वर्षीय भारतीय स्टार वैभव सूर्यवंशीची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. सूर्यवंशी पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणार आहे. बिहार संघाने 17 सदस्यीय संघ जाहीर केला असून, सूरज कश्यप उपकर्णधार आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
बीसीएचे अध्यक्ष हर्ष वर्धन काय म्हणाले?
संघ त्याच्या नेतृत्वाखाली आगामी स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. बीसीएचे अध्यक्ष हर्ष वर्धन म्हणाले, "वैभवने लहान वयातच प्रचंड प्रतिभा, आत्मविश्वास आणि परिपक्वता दाखवली आहे, आणि ही जबाबदारी त्याला एक क्रिकेटपटू आणि नेता म्हणून विकसित होण्याची आणखी एक संधी देईल. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
वैभव सूर्यवंशी बिहारचा नवा कर्णधार
या स्पर्धेसाठी बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची कर्णधार म्हणून, तर सूरज कश्यप उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वैभव पहिल्यांदाच बिहारच्या वरिष्ठ संघाचे नेतृत्व करणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 चे आयोजन
बीसीसीआयतर्फे 14 नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 चे आयोजन केले जाणार आहे. बिहार संघासह सर्व संघांनी या स्पर्धेसाठी आपले संघ जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया