• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /वैभव सूर्यवंशीच्या नावावर नवा विक्रम, ठरला टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार!

वैभव सूर्यवंशीच्या नावावर नवा विक्रम, ठरला टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार!

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 14, 2026, 03:07 PM IST|Updated: Nov 14, 2026, 04:03 PM IST
joinshare
भारतीय संघाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत पाहायला मिळत आहे, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला.

वैभव सूर्यवंशी जगभरातील टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार बनला. त्याने एका क्रोएशियन फलंदाजाच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला. 

Vaibhav Sooryavanshi is the youngest captain in T20 cricket 1/8

टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार

भारतीय देशांतर्गत टी20 क्रिकेट स्पर्धा सय्यद मुश्ताक अलीची आणखी एक आवृत्ती शनिवार, 14 नोव्हेंबर 2026 रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा या 15 वर्षीय वंडर बॉयसाठी ऐतिहासिक आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Vaibhav Sooryavanshi is the youngest captain in T20 cricket 2/8

टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याची बिहार संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. आज त्याचा संघ इंदूरच्या होळकर स्टेडियमवर राजस्थानविरुद्ध खेळत आहे. बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Vaibhav Sooryavanshi is the youngest captain in T20 cricket 3/8

टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर नाणेफेकीसाठी मैदानावर येताच वैभव सूर्यवंशीने इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले आहे. तो टी20 क्रिकेटचे कर्णधारपद भूषवणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. हा विश्वविक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Vaibhav Sooryavanshi is the youngest captain in T20 cricket 4/8

टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार

भारतीय देशांतर्गत क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवर या जागतिक विक्रमाची माहिती दिली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Vaibhav Sooryavanshi is the youngest captain in T20 cricket 5/8

टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार

नाणेफेकीची माहिती देण्यासोबतच, BCCI डोमेस्टिकने X वर लिहिले - "बिहारने नाणेफेक जिंकून सौराष्ट्रविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वैभव सूर्यवंशी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी पुरुष टी20 इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार बनला असून त्याने संघाची सूत्रे हाती घेतली आहेत." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Vaibhav Sooryavanshi is the youngest captain in T20 cricket6/8

टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार

वैभव सूर्यवंशीच्या आधी, हा विक्रम क्रोएशियन खेळाडू झॅक वुकुसिकच्या नावावर होता, ज्याने 7 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या 17 वर्षे आणि 311 दिवसांनी सायप्रसविरुद्ध टी20 संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Vaibhav Sooryavanshi is the youngest captain in T20 cricket7/8

टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार

या विश्वविक्रमापूर्वी वैभव सूर्यवंशीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम आहेत. तो 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्कार जिंकणारा सर्वात तरुण टी20 खेळाडू आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Vaibhav Sooryavanshi is the youngest captain in T20 cricket 8/8

टी20 क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार

तो भारताचा सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू देखील आहे. त्याने आयपीएलमध्येही अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2025 च्या आयपीएलमध्ये झाली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Vaibhav Sooryavanshi
Team india
Sports News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.