Saptahik Ank Jyotish 16 to 22 November 2026 in Marathi : हा आठवडा तुमच्या जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून
Saptahik Ank Jyotish 16 to 22 November 2026 in Marathi : नोव्हेंबरचा तिसरा आठवडा 1 ते 9 मूलांकासाठी चढ - उतारा असणार आहे. या आठवड्यात इतरांना समजून घेण्याची, संयम बाळगण्याची आणि एकत्रितपणे काम करण्यांसाठी चांगला असणार आहे. काही लोकांना मोठं यश मिळणार आहे. तर काही लोकांना आर्थिक व्यवहार आणि नात्यामध्ये सावधगिरी बाळगायची आहे.
1/9
मूलांक 1 (1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक)
या आठवड्यात तुमच्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य द्या. सोबतच इतरांच्या मतांचाही विचार करा. कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक विचार करा. अपूर्ण माहितीशिवाय कोणतेही निर्णय घेऊ नका. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. सततच्या कामामुळे तुम्हाला थकवा जाणवणार आहे. त्यामुळे चांगला आहार आणि विश्रांती घ्या. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना काळजी घ्या.
2/9
मूलांक 2 (2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)
इतरांच्या भावना आणि समज समजून घेण्याची तुमची क्षमता आणखी वाढवणार आहे. कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्याने तुमच्यासाठी नवीन संधी मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे इतरांच्या प्रभावाखाली येऊन पैसे उधार देऊ नका. इतरांच्या समस्या आणि चिंता फार मनावर घेणे महागात पडू शकतं. कारण यामुळे मानसिक ताण वाढणार आहे. तुमचे मन आनंदी ठेवण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे हिताचे ठरणार आहे.
3/9
मूलांक 3 (3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक)
तुमची संभाषण शैली आणि नवीन गोष्टी शिकण्याचा स्वभाव तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. तुम्हाला या स्वभावामुळे मोठं फायदे होणार आहे. वरिष्ठांशी संवादातून करिअरमध्ये फायदा होणार आहे. पैशांच्या बाबतीत, दिखाव्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च करणे तुम्हाला महागात पडणार आहे. तर खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरणार आहे. कामाच्या अति ताणामुळे मानसिक थकवा जाणवणार आहे.
4/9
मूलांक 4 (4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
सर्व काही योग्य करण्याचा स्वभाव तुमच्यासाठी या आठवड्यात नवीन संधी आणणार आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायातील जुन्या करारांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन होणार आहे. कामाच्या प्रचंड ताण या आठवड्यात राहणार आहे. पण आपल्या आरोग्याची काळजी नक्की घ्या. नियम आणि तर्काला चिकटून राहण्याऐवजी, आपल्या प्रियजनांच्या भावनांना प्राधान्य द्या. कुटुंबातील सदस्यांसोबतची शांत चर्चा जुने वाद कायमचे मिटवण्यास हा आठवडा योग्य असणार आहे.
5/9
मूलांक 5 (5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक)
हा आठवडा नवी संधी समोर येणार आहे. पण प्रत्येक पैलूचे काळजीपूर्वक परीक्षण करुन निर्णय घ्या. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तर व्यवहारांमध्येही काळजी घ्या. आर्थिक संतुलन राखण्यासाठी अनावश्यक खरेदी चुकूनही करु नका. या आठवड्यात तुमचं मन चंचल मन असणार आहे. त्यामुळे लक्ष विचलित करु नका. कामातही आरामाकडे दुर्लक्ष करा. नात्यांमध्ये, तुमच्या स्वातंत्र्याची तसंच तुमच्या प्रियजनांच्या अपेक्षांची जाणीव ठेवून स्पष्ट बोलणे हिताचे ठरणार आहे.
6/9
मूलांक 6 (6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
तुमची सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा स्वभाव कामाच्या ठिकाणी वातावरण आनंददायी करणार आहे. तर भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा. इतरांना मदत करताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. जोडीदारासोबत घरगुती जबाबदाऱ्या वाटून पुढे गेल्यास फायदा मिळले. तर जोडीदारासोबत चांगला वेळ नाते अधिक घट्ट करेल.
7/9
मूलांक 7 (7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक)
तुमची सखोल विचार करण्याची सवय या आठवड्यात एखादे सत्य उघड करण्यास फायदेशीर ठरणार आहे. मोठं निर्णय घेणार असाल तर अपूर्ण माहितीच्या आधारावर काही करु नका. मनं शांत करण्यासाठी एकटे राहणे हिताचे ठरणार आहे. जोडीदारासोबत मनातील भावना व्यक्त करा. तुमच्यामधील गैरसमज दूर होण्यास मदत मिळेल.
8/9
मूलांक 8 (8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक)
कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगला समन्वय साधा. यातून तुम्हाला मोठं ध्येय प्राप्त होईल. तसंच तुमच्या योजना वरिष्ठांना किंवा सहकाऱ्यांना आवडणार आहे. तर व्यावसायिकांचे जुने संबंध अधिक दृढ होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कामाच्या ध्यासापोटी तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं. कुटुंबात आनंद असणार आहे. प्रियजनांप्रती थोडं प्रेम आणि माया दाखवा.
9/9
मूलांक 9 (9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक)
हा आठवड्यात तुमचा उत्साह आणि पुढे जाण्याची जिद्द एका यशाकडे वाटचाल करणार आहात. तसंच इतरांच्या मतांनाही प्राधान्य देवून ते ऐकण्याची हिम्मत ठेवा. अनावश्यक चिडचिडे न करता आर्थिक व्यवहारावर लक्ष द्या. इतरांच्या समस्यांचे स्वतःवर ताण घेणे टाळा. आपली ऊर्जा वाचवा आणि आराम करा. तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होण्याचे चिन्ह आहे. तरदुसरीकडे नात्याला एक नवीन दिशा देण्यासाठी हीच योग्य वेळ असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)