• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Weekly Tarot Horoscope : दिवाळीचा आठवडा लाभदायक! करिअर अन् व्यवसायात धमाकेदार यश, तर लक्ष्मीमाता होणार या लोकांवर प्रसन्न

Weekly Tarot Horoscope : दिवाळीचा आठवडा लाभदायक! करिअर अन् व्यवसायात धमाकेदार यश, तर लक्ष्मीमाता होणार या लोकांवर प्रसन्न

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 02, 2026, 08:09 AM IST|Updated: Nov 02, 2026, 08:15 AM IST
joinshare
Weekly Tarot Horoscope Prediction 2 to 8 November 2026 in Marathi : दिवाळी आणि नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या.

Weekly Tarot Horoscope Prediction 2 to 8 November 2026 in Marathi : नोव्हेंबरचा पहिला आठवड्यात दिवाळीला सुरुवात होणार आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनचा हा आठवडा अनेक राशींच्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रगती आणि यश घेऊन आला आहे. करिअर, प्रेम जीवन, आर्थिक बाबी आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल दिसणार आहे. असा हा दिवाळीचा आठवडा 2 ते 8 नोव्हेंबरचा काळ मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझाकडून

Weekly Tarot Horoscope1/12

मेष (Aries Zodiac)

या आठवड्यात कामाचा ताण तुम्हाला अतिरिक्त थकवा देणार आहे. अनेक जबाबदाऱ्या एकट्यावर न घेता त्या सहकाऱ्यांकडून करून घ्या. कामांना प्राधान्य देणं हिताचे ठरणार आहे. एखाद्या सहकाऱ्याचे शब्द तुम्हाला दुखावणार आहे. त्यामुळे अशा स्थिती वाद घालण्यापेक्षा शांत राहणे हिताचे ठरणार आहे. तुमच्या प्रेम जीवनातील लहानसहान गोष्टींचे मोठे प्रकरण करणे तुम्हाला महागात पडू शकतं. जोडीदाराचे वागणे तुमच्या अपेक्षेनुसार नाही म्हणून वाद करण्यापेक्षा त्यांना समजून घ्या. अनावश्यक खर्च टाळा.
Weekly Tarot Horoscope2/12

वृषभ (Taurus Zodiac)

या आठवड्यात प्रगती आणि यश हे दोन्ही तुम्हाला सकारात्मक दृष्टीकोन देणार आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. व्यवसायात नवीन करार होण्याचे संकेत आहे. मात्र, या उत्साहात आवश्यक तयारीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं. व्यावहारिक विचार तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजूबत स्थिती नेणार आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे देखील तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. दिवाळी आहे, अशात आपल्या जोडीदारासोबत वेळ द्या. एकमेकांच्या गरजा समजून घेण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे. आरामाकडेही लक्ष द्या.
Weekly Tarot Horoscope3/12

मिथुन (Gemini Zodiac)

दिवाळी आठवडा अशात कामाच्या ठिकाणी कामात विलंब होणार आहे. पण एखाद्या सहकाऱ्याशी संवाद साधून पुढे जाणे हिताचे ठरले. कामाच्या ठिकाणी एखादी परिस्थिती चिघळण्याचे संकेत आहेत. अशात संपर्क टिकवून ठेवणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे. प्रेम जीवनात जोडीदासोबत झालेले वाद टाळण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणे फायदेशीर ठरेल. आर्थिक भागीदारीचे नियोजन करताना जागृत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Weekly Tarot Horoscope4/12

कर्क (Cancer Zodiac)

दिवाळीच्या या आठवड्यात कामाचा वेग कमी होणार आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाणार आहे. कामात तुम्ही बिझी बिझी राहणार आहात. पण अशात कुटुंबाकडे दुर्लक्ष करु नका. दिवाळीचा सण आहे, समन्वय ठेवा. नवीन व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी, चोहूबाजूने विचार करून पुढे जाणे हिताचे ठरेल. नात्यामध्ये एखाद्याच्या वागणुकीबद्दल पुराव्याशिवाय लगेच नकारात्मक दृष्टीकोनावर जाऊ नका. आर्थिक बाबतीत, झटपट फायद्यासाठी अनिश्चित योजनांवर गुंतवणूक करणे महागात पडू शकतं.
Weekly Tarot Horoscope5/12

सिंह (Leo Zodiac)

हा दिवाळीचा आठवडा अनेक कल्पना आणि संधी घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक आणि नवीन जबाबदारी घेऊन हा आठवडा आला आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीमुळे कामाच्या ठिकाणी अडथळे येण्याचे संकेत आहेत. सर्व काही एकदम करण्यापेक्षा नियोजन करा. आर्थिक बाबींमध्ये बचतीवर भर द्या. गुंतवणूक करणे हिताचे ठरणार आहे. असुरक्षिततेमुळे तुमच्या जोडीदारावर अतिरिक्त नियंत्रण ठेवणे नात्यात तणाव निर्माण करेल. कुटुंबात पैशांच्या किंवा जबाबदाऱ्यांच्या बाबतीत वाद होण्याचे संकेत आहेत.
Weekly Tarot Horoscope6/12

कन्या (Virgo Zodiac)

एखादी जुनी पद्धत कामात अडथळा निर्माण करणार आहे. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन आणि सकारात्मक दृष्टीकोनातून पुढे जाणे हिताचे ठरेल. एखाद्या व्यक्तीच्या कृतीवर तात्काळ प्रतिक्रिया देणे टाळा. घाईघाईने निर्णय घेण्यापूर्वी चर्चेतून मार्ग काढा. प्रेम संबंधात तुम्ही दुखावले जाण्याचे संकेत आहेत. रागात प्रतिक्रिया देण्यापेक्षा नात्यातील गोष्टी समजून घ्या. आर्थिक बाबीमध्ये दबावाखाली निर्णय घेऊ नका.
Weekly Tarot Horoscope7/12

तूळ (Libra Zodiac)

कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायातील एखाद्या जुन्या निर्णयाचा परिणाम तुम्हाला या आठवड्यात दिसणार आहे. तुमच्या भविष्यातील योजना पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या आठवड्यातील सकारात्मक घडामोडी तुम्हाला उत्साह देणार आहे. जोडीदारासोबतचा संवाद नात्याला नवीन दिशा देणार आहे. एखादे नातं कठीण काळातून जात असल्यास त्यात सकारात्मक बदल दिसेल. आर्थिक बाबतीत बँक बॅलेन्स उत्तम स्थितीत असणार आहे. दिवाळीनिमित्त कुटुंबासाठी काहीतरी खास करणार आहात.
Weekly Tarot Horoscope8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ लावणे तुमच्यासाठी गुंतागुंतीचे ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबादारीसोबत यशाकडे वाटचाल करणार आहात. पण दुसरीकडे सहकाऱ्याचा एखाद्या कृतीमुळे वाद होण्याचे संकेत आहेत. पण अशावेळी शांत राहून आपल्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीबद्दल आपला अंदाज लावण्यापेक्षा संवाद साधून स्पष्टता मिळवा. आर्थिक गोष्टीत बँक बॅलेन्स वाढणार आहे. या आठवड्यात निर्णय घेताना गोंधळ करु नका.
Weekly Tarot Horoscope9/12

धनु (Sagittarius Zodiac)

या आठवड्यात इतरांच्या इच्छा किंवा ध्येय असो अपेक्षांवर पुनर्विचार करावा लागणार आहे. प्रत्येकाला तुम्ही खूष ठेवू शकत नाही. नोकरी असो किंवा व्यवसायात योग्य दिशेने वाटचाल महत्त्वाची असणार आहे. जुन्या संधीचे सोनं करण्याची सुवर्ण संधी या आठवड्यात चालून आली आहे. हा काळ तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आहे. प्रेमात भावनिक राहणे हिताचे ठरणार आहे. जोडीदारासोबत भविष्याबद्दल संवाद होणार आहे. आर्थिकबाबीसाठी दिखावा टाळा.
Weekly Tarot Horoscope10/12

मकर (Capricorn Zodiac)

कामाच्या ठिकाणी या आठवड्यात अडचणी दिसत आहेत. कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पात तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. तर व्यावसायिक बोलायचं झालं तर इथे पाटर्नरसोबत मतभेदाचे संकेत आहेत. जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टीसोबत पुढे वाटचाल करणे सोपे ठरणार आहे. नात्यांमध्ये जोडीदारासोबत गैरसमज दूर करण्याची संधी मिळणार आहे. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. नुसते पुढे वाटचाल करण्यापेक्षा ध्येय ठरवून पुढे जा.
Weekly Tarot Horoscope11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

हा आठवडा तुम्हाला आनंद देणारा असणार आहे. काम असो किंवा कुटुंबात मिळणारा पाठिंबा तुम्हाला धीर देणार आहे. नवीन कल्पनावर चर्चा होणार आहे. नवीन संधी तुमची वाट पाहत असणार आहे. एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समजून घ्या. एका मोठ्या बदलासाठी तयार व्हा. एकमेकांसोबतचा वेळ नात्यात जवळीक आणणार आहे. नात्यात वेळ हा महत्त्वाचा असतो ते समजून घ्या. आर्थिक व्यवहारात घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या.
Weekly Tarot Horoscope12/12

मीन (Pisces Zodiac)

कामाच्या ठिकाणी इतरांना मदत करण्यापेक्षा स्वत:च्या कामाकडे लक्ष केंद्रीत करा. कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पावरून सहकाऱ्यांशी वाद होण्याचे संकेत आहेत. हा काळ दृष्टिकोन बदलण्याचा ठरणार आहे. जोडीदारासोबत क्षुल्लक कारणावरून वाद करु नका. नात्यासाठी काय महत्त्वाचे आहे ते समजून घ्या. मोकळा संवाद महत्त्वाचा ठरेल. आर्थिक व्यवहारात जागृत रहा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
TAGS:
Weekly Horoscope
Horoscope
Astrology

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्रात 'मनी हाइस्ट' ३५ कोटींचं सोनं अन् 12 लाखांची रोकड, SBI बँकेतील दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला बडतर्फ PSI

महाराष्ट्रात 'मनी हाइस्ट' ३५ कोटींचं सोनं अन् 12 लाखांची रोकड, SBI बँकेतील दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला बडतर्फ PSI

2

25 वर्षीय विवाहितचे धक्कादायक कृत्य, 2 बॉयफ्रेंडला घरी बोलवलं अन् मग...घटनेमुळे एकच खळबळ

3

भिवंडीकरांना थेट मुंबई गाठता येणार; ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिकेबाबत मोठी अपडेट, मेट्रो 5 चा आणखी विस्तार होणार

4

माजी कॅबिनेट मंत्र्याच्या घरी पोहोचली ED ची टीम; पहाटे 5 वाजता धाड, 16 ठिकाणी टाकले छापे, कोण आहे हा नेता?

5

₹11 लाख घे आणि नोकरी सोड! Microsoft ने इंजिनिअर तरुणाला का दिली ही ऑफर?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.