• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /पाकिस्तानकडून U-19 आशिया कप हिसकावणारा कोण आहे मोहित उल्वा?

पाकिस्तानकडून U-19 आशिया कप हिसकावणारा कोण आहे मोहित उल्वा?

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 14, 2026, 10:47 PM IST|Updated: Nov 14, 2026, 10:57 PM IST
joinshare
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना दीर्घकाळ स्मरणात राहील. भारतीय संघाने शनिवारी (14 नोव्हेंबर) शेवटच्या चेंडूवर एका विकेटने थरारक विजय मिळवून विजेतेपद पटकावले.

एसीसी पुरुष 19 वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद पटकावले. अंतिम सामना अत्यंत रोमांचक होता, ज्यात युवा मोहित उल्वा भारताचा सुपरस्टार बनला.

Who is mohit ulva1/8

कोण आहे मोहित उल्वा?

भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून एसीसी पुरुष 19 वर्षांखालील आशिया कप ट्रॉफी जिंकली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Who is mohit ulva2/8

कोण आहे मोहित उल्वा?

एका क्षणी, पाकिस्तान 19 वर्षांखालील क्रिकेट संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु मनाल चौहान आणि मोहित उल्वा यांनी सामन्याचे चित्रच पालटून टाकले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Who is mohit ulva3/8

कोण आहे मोहित उल्वा?

विशेषतः, सामना पूर्ण करणाऱ्या मोहित उल्वाला आता भारताचा सुपरस्टार म्हणून गौरवले जात आहे. चाहते या तरुण स्टारबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Who is mohit ulva4/8

कोण आहे मोहित उल्वा?

अंतिम सामन्यात गोलंदाज मोहित उल्वा दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने अवघ्या 26 चेंडूंमध्ये नाबाद 49 धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Who is mohit ulva5/8

कोण आहे मोहित उल्वा?

युवा एकदिवसीय सामन्यात त्याने 188.46 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली, ज्यात पाच चौकार आणि तीन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Who is mohit ulva6/8

कोण आहे मोहित उल्वा?

मोहितचा जन्म 30 नोव्हेंबर 2007 रोजी गुजरातमध्ये झाला. तो सौराष्ट्र संघाकडून खेळतो. त्याने भारतीय दिग्गज रवींद्र जडेजाचे माजी प्रशिक्षक महेंद्र सिंग चौहान यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले. त्यामुळेच त्याला जामनगरचा पुढचा स्टार म्हटले जाते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Who is mohit ulva7/8

कोण आहे मोहित उल्वा?

मोहितला वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू बनायचे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेट खेळून केली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Who is mohit ulva8/8

कोण आहे मोहित उल्वा?

मोहितचे वडील रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत आहेत. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणे हे मोहितचे पुढील ध्येय आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Team india
Cricket News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.