AI सेक्टरमध्ये पाटलाने राडा घातला आहे. यश पाटील नावाच्या तरुणाने आपली AI कंपनी 40,000 कोटींना विकली आहे.
Yash Patil Applied Compute Palo Alto Networks Acquisition : 23 वर्षाच्या यश पाटील नावाच्या तरुणाची सध्या जगभर चर्चा आहे. यश पाटील याने आपली AI कंपनी 40,000 कोटींना विकली आहे. AI सेक्टरमधील ही मोठी डील मानली जात आहे. यश आता मोठी कंपनी लीड करत आहे. कोल्हापुरच्या सतेश पाटील यांनी यश पाटील याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
1/8
काँग्रसचे दिग्गज नेते कोल्हापुरचे सतेज पाटी यांनीसोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत यश पाटील याला शुभेच्छा दिल्या आहेत. यश पाटील याने आपली AI कंपनी 40 हजार कोटींना विकली आहे. यश पाटीलचे सतेज पाटीलांशी काय कनेक्शन? अशी चर्चा देखील रंगली आहे.
2/8
यश पाटील फक्त 23 वर्षांचा आहे. त्याने स्वतःची AI कंपनी उभारून ती तब्बल 40 हजार कोटी रुपयांना विकली आहे.
3/8
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या यश पाटील याच्या Applied Compute कंपनीने सायबर सुरक्षा कंपन्यांपैकी एक असलेल्या Palo Alto Networks सोबत करार केला आहे.
4/8
यश पाटील याने 4.5 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 40 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. यश पाटील याच्या या डीलची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
5/8
यशने फक्त दीड वर्षांत शून्यातून ही कंपनी उभी केली. यशने OpenAI या आघाडीच्या AI कंपनीमध्ये काम करत करिअरला सुरुवात केली. त्याच्या कंपनीच्या यशामुळे त्याला जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या Palo Alto Networks मध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे.
6/8
यशने अमेरिकेतील प्रसिद्ध Stanford University मधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्याने स्टार्टअप क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
7/8
यश पाटील हे भारतीय वंशांचे आहेत. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरात ते वाढले. सप्टेंबर 2026 च्या फोर्ब्स प्रोफाइलनुसार, त्यांची आई बालरोगतज्ञ आहेत. तर त्यांचे वडील हार्डवेअर इंजिनिअर आहेत.
8/8
काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी सोशल मिडीयावप पोस्ट लिहून यश पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. पुढील अनेक यशस्वी टप्प्यांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.