Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 28 November 2026 in Marathi : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा शनिवार हा अनेकांसाठी चांगला असणार आहे. आज कार्तिक कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे. तर पंचांगानुसार आज शुक्ल योग आहे. असा आजचा दिवस मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. कोणालातरी मदत करणार आहात. कामाच्या ठिकाणी एखाद्या मित्राचा आधार तुम्हाला हितकारक ठरणार आहे. अनेक आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. प्रियजनांचा पाठिंबा योग्य दिशेने मार्गदर्शन करणारा ठरणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. धार्मिक रस वाढणार आहे. नवीन कामात समाधान मिळणार आहे. प्रॉपर्टी डीलरसंबंधित आजचा दिवस सकारात्मक असणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी हितकारक असणार आहे. नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबात शांतता आणि आनंद नांदणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होणार आहे. जुन्या आठवणीतून तुम्हाला मदत मिळणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी आंनद घेऊन आला आहे. चांगल्या वागणुकीमुळे समाजात प्रसन्नता वाढणार आहे. कामाचा ताण जास्त असणार आहे. संयमातून तुम्हाला यश मिळणार आहे. जोडीदाराची मदत फायदेशीर ठरणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून येणार आहे. आयुष्यात सकारात्मक गोष्टी बदलणार आहे. आज कोणत्याही नवीन कामाला सुरूवात करु नका. कुटुंबातील कोणतेही चालू असलेले वाद मिटणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. बऱ्याच काळापासून आज न झालेले काम मार्गी लागणार आहे. तुम्हाला कामात यश मिळणार आहे. तुमचे बँक खाते अधिक मजबूत होणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही राहणार आहे. आई - वडिलांसोबत नातेवाईकांच्या घरी जाणार आहात. करिअर संबंधित समस्या दूर होणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढणार आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. मनातील कोणतीही भीती तुमच्या कामात अडथळा आणेल. त्यामुळे सकारात्मकदृष्टीकोनातून पुढे जा. आज जरा शारीरिक थकवा जाणवणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस हिताचा ठरणार आहे. एखादा वाद तुमच्यासाठी आज निर्णायक ठरू शकतो. आज वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होणार आहे.
मकर (Capricorn Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. कोणतेही मोठे काम हाती घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. एखाद्याची अनपेक्षित भेट तुम्हाला आनंद देणारी ठरणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. घरातील कोणत्याही समस्या मात करत घरात आनंदी वातावरण ठेवणार आहा. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रियजनांसोबत आजचा दिवस खूप खास ठरणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. घरातील सदस्यासोबतचे वाद मिटतील. धार्मिक कार्यात रस घेणार आहात. समस्यांवर मात करण्यात यशस्वी होणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)