• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2026 : संकष्टी चतुर्थीला परीघ योग! या राशींना मिळणार बाप्पा आशीर्वाद आणि लाभ

आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2026 : संकष्टी चतुर्थीला परीघ योग! या राशींना मिळणार बाप्पा आशीर्वाद आणि लाभ

Aajche Rashi Bhavishya 29 October 2026 : संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथचा आजचा दिवस 12 राशीच्या लोकांवर कसा असणार आहे, जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 29, 2026, 06:44 AM IST|Updated: Oct 29, 2026, 06:48 AM IST
joinshare
आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2026 : संकष्टी चतुर्थीला परीघ योग! या राशींना मिळणार बाप्पा आशीर्वाद आणि लाभ
Image Credit: Daily Horoscope

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'आमने-सामने'तून केतकी-रोहनची एक्झिट, आता नव्या जोडीची एन्ट्री, नवीन प्रयोगाची तारीखही सांगितली

'आमने-सामने'तून केतकी-रोहनची एक्झिट, आता नव्या जोडीची एन्ट्री, नवीन प्रयोगाची तारीखही सांगितली

2

सोलापूरची कन्या ठरली WPL 2027 ऑक्शनमधली सर्वात महागडी भारतीय खेळाडू, पाहा 5 महागड्या खेळाडूंची लिस्ट

3

निकाल लागताच महायुतीच ठिणगी! मित्रपक्षाने युतीचा धर्म पाळला नाही, प्रवीण दरेकरांचा आरोप, 'धंगेकरांना वरुन आदेश आले...'

4

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षनिवडीच्या काही तासाआधी मोठा ट्विस्ट, 350 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

5

कोण आहे उमा काश्वी? वैभव सूर्यवंशीपेक्षा कमी वयात मिळालं WPL मध्ये संधी, कहाणी वाचून तुम्हीही कौतुक कराल

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 29 October 2026 in Marathi : पंचागानुसार आजचा गुरुवारला आश्विन कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे. रोहिणी नक्षत्र आणि परिघा योगाचा शुभ प्रभाव आज 12 राशींवर प्रभाव टाकणार आहे. तसंच आज वैवाहिक महिलांसाठी खास असा करवा चौथचं व्रत आहे. असा आजचा गुरुवारचा दिवस काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार आहे, जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

आज तुम्हाला अनेक पर्यायांमधून योग्य मार्ग निवडायचा आहे. नोकरी किंवा व्यवसायात चांगली संधी चालून येणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. जोडीदाराला तुमच्या भावनिक आधाराची गरज असणार आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

नवीन संधी किंवा नवीन योजना प्रत्यक्षात आणण्याचा आजचा दिवस असणार आहे. बाप्पााच्या आशीर्वादाने कामात यश प्राप्त होणार आहे. जोडीदाराला वेळ द्या. नात्यात घाई करु नका.


मिथुन (Gemini Zodiac)

आज तुमच्या समस्येव उपाय सापडणार आहे. कामाच्या ठिकाणी मात्र काहीशी चिंता वाटणार आहे. तणावामुळे घाईने प्रतिक्रिया देऊ नका. मानसिक गोंधळामुळे जोडीदाराशी वाद होण्याचे संकेत आहेत.


कर्क (Cancer Zodiac)  

नातेसंबंध आणि महत्त्वाच्या कामासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. अनुभवांना हेरा आणि नवीन संधीच्या आहारी जाऊ नका. नात्यातील जुने वाद मिटणार आहे.

सिंह (Leo Zodiac)

सहकार्य आणि निर्णयक्षमता यांच्यामध्ये चांगले संतुलन राहणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याकडून उत्तम साथ मिळणार आहे. न बोलता नात्यामधील प्रश्न सुटणार नाही हे लक्षात घ्या.


कन्या (Virgo Zodiac)  

अनेक दिवसांपासून चल ढकल केलेल्या महत्त्वाच्या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. आता जुने मागे सोडून नवीन गोष्टी शिका. प्रेम जीवनात भावनिक दुरावा जाणवणार आहे. 
 

तूळ (Libra Zodiac)  

आज तुम्हाला आकर्षण आणि वास्तव यामधील फरक समजून पुढे वाटचाल करावी लागणार आहे. घाईघाई एका बाजूला आपली साथ न देतात गोष्टी समजून घ्या. वैवाहिक जीवन असो किंवा प्रेम जीवन यामध्ये प्रेमाचा वर्षाव होणार आहे.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आज तुम्हाला तणावातून दिलासा मिळणार आहे. शिवाय तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. नवीन संधीबद्दल सावध राहणे हिताचे ठरणार आहे. आर्थिक व्यवहारात सतर्क राहा.

धनु (Sagittarius Zodiac)

भूतकाळातील अनुभवावरून पुढे वाटचाल करा. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे प्रकल्पावर काम करावे लागणार आहे. वस्तूस्थिती समजून काम करा. जोडीदाराशी मोकळा संवाद नात्यात प्रेम वाढवेल.

मकर (Capricorn Zodiac)  

आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत संतुलन राखावे लागणार आहे. इतरांच्या मतांचा आदर करणे फायदेशीर ठरणार आहे. करिअर असो किंवा व्यवसायात चांगली संधी मिळणार आहे. जोडीदार किंवा कुटुंबासोबत भावनिक जवळीक वाढणार आहे.


कुंभ (Aquarius Zodiac)

एखाद्या गोष्टीमध्ये गोंधळ वाटणार आहे. घाईघाईने एखादी योजना करु नका. कामाच्या ठिकाणी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. प्रेम जीवनात संवादातून गैरसमज वाढण्याची शक्यता आहे.

मीन  (Pisces Zodiac)  

कामाच्या ठिकाणी मतभेद होण्याचे संकेत आहेत. वाद वाढविण्यापेक्षा त्यातून संयमाने मार्ग काढणे हिताचे ठरणार आहे. जबाबदाऱ्या वाटून पुढे जा. जोडीदारासोबत क्षुल्लक गोष्टीवरून वाद टाळा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Horoscope
Daily Horoscope
Astrology