SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आजचे राशीभविष्य 30 ऑक्टोबर 2026 : शिव योगामुळे 2 राशींसाठी लाभदायक, तर 4 राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

Aajche Rashi Bhavishya 30 October 2026 : आज शुक्रवारी शिव योग असून याचा परिणाम 12 राशीच्या लोकांवर पडणार असल्याने, जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 30, 2026, 07:05 AM IST | Updated: Oct 30, 2026, 07:09 AM IST
Image Credit: Rashi Bhavishya 30 October 2026
Join


Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 30 October 2026 in Marathi : पंचागानुसार आजचा शुक्रवारी आश्विन कृष्ण पक्षाची पंचमी तिथी असून सोबत शिव योग असणार आहे. शुक्रवार हा देवीला समर्पित वार असून ती धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची कारक मानली जाते. असा आजचा शुक्रवारचा दिवस काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार आहे, जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

नवीन कल्पनेबद्दल किंवा कामाबद्दल तुमच्यामध्ये आज प्रचंड उत्साह दिसून येईल. नवीन जबाबदारी खाद्यांवर पडणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

एखाद्या चुकीमुळे किंवा अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे तुम्हाला थोडी निराशा वाटणार आहे. आर्थिक परिस्थितीची इतरांशी तुलना घातक ठरेल. जोडीदारासोबतची तक्रार संवादातून सोडवा.


मिथुन (Gemini Zodiac)

एकाच वेळी अनेक कामं अंगावर घेतल्यामुळे गोंधळ उडणार आहे. प्रेमसंबंधाबद्दल आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. उत्पन्न आणि खर्चात समन्वय ठेवा.


कर्क (Cancer Zodiac)  

आज तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात चांगली संधी मिळणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. नात्यांमध्ये भावनिक संतुलन राखा.

सिंह (Leo Zodiac)

प्रत्येक गोष्टीवर आंधळा विश्वास घातक ठरून शकतो. कामाबद्दल असो किंवा निर्णयांबद्दल सावध राहा. प्रेमात अहंकाराला जागा देऊ नका.


कन्या (Virgo Zodiac)  

आज एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेणार आहात. आज एखादी गोष्ट अपेक्षाप्रमाणे घडणार नाही. जोडीदारासोबत क्षुल्लक गोष्टीवरून वाद होण्याचे संकेत आहेत. 
 

तूळ (Libra Zodiac)  

आज कामात घाई गडबड करु नका. गैरसमज आणि अनावश्यक ताण तुम्हाला त्रासदायक ठरेल. वैयक्तिक आवडीनिवडींवर खर्च होणार आहे. नात्यांमध्ये संवाद ठेवा.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टींची सांगड घालत पुढे वाटचाल करा. कोणताही निर्णय भावनिक होऊ घेऊ नका. नात्यात जुने वाद त्रासदायक ठरणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

नोकरी किंवा व्यवसायात शुभ संकेत आहेत, सकारात्मक गोष्टी घडणार आहे. प्रेम आणि मैत्रीमध्ये दिलासादायक गोष्टी ठरणार आहे. नात्यात संवादातून पुन्हा जिव्हाळा निर्माण होणार आहे.

मकर (Capricorn Zodiac)  

रखडलेले काम पुन्हा सुरू करण्याची इच्छा जागृत होणार आहे. प्रेम किंवा वैवाहिक जीवनात निराशा जाणवणार आहे. घरगुती खर्च वाढणार आहे.


कुंभ (Aquarius Zodiac)

कामाच्या ठिकाणी तुमचे मत स्पष्टपणे मांडा. लहानसहान गोष्टींवरून मन खराब करु नका. कठोर शब्द नात्यात दुरावा आणतील म्हणून रागावर नियंत्रण ठेवा.

मीन  (Pisces Zodiac)  

नोकरी किंवा व्यवसायात चांगली संधी तुम्हाला उत्साहदायक ठरणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये मतभेद निर्माण होणार आहे. आर्थिक बाबींमध्ये भावनिक दबावाखाली निर्णय घेणे घातक ठरणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES