SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Baba Vanga Prediction 2026 : पुढील 7 दिवसात 5 राशीच्या लोकांसाठी सोन्यासारखे, बाबा वेंगाची भविष्यवाणी

Baba Vanga Horoscope Prediction 19 to 25 October 2026 : दसरा आणि कोजागरी पौर्णिमेचा हा आठवडा 5 राशीच्या लोकांसाठी सोन्यासारखे असणार आहे. बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 17, 2026, 10:49 PM IST | Updated: Oct 17, 2026, 10:52 PM IST
Image Credit: Baba Vanga Horoscope
Join

Baba Vanga Horoscope Prediction 19 to 25 October 2026 in Marathi : आक्टोबर महिन्याच्या या आठवड्यात दुर्गाष्टमी, महानवमी, विजयदशमी म्हणजे दसरा आणि कोजागरी पौर्णिमाचा असणार आहे. या आठवड्यातील सात दिवस अनेक शुभ योग जुळून आले आहेत. प्रसिद्ध भविष्यवर्ते बाबा वेंगा यांनी हा आठवडा कोणत्या पाच राशींसाठी सोन्यासारखा असणार आहे, याचं भाकीत केलं आहे.

कुंभ रास

हा दसऱ्याचा आठवडा तुमच्यासाठी प्रगती घेऊन आला आहे. रखडलेल्या कामं मार्गी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी खांद्यावर पडणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्याला चांगली संधी गवसणार आहे. व्यवसायिकांसाठीही चांगला आणि सकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. आर्थिक नियोजन भविष्य मजबूत करणार आहे. कुटुंबासोबत सुखद क्षण अनुभवणार आहात.


धनु रास

या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरदार वर्गासाठी हा आठवडा आनंदाचा असणार आहे. व्यवसायिकांसाठीही सकारात्मक गोष्टी, नवीन करार होणार आहे. आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचे वेळ घालवणार आहात. एखादे महत्त्वाचे कामं मार्गी लागल्यामुळे मनशांती मिळणार आहे.


सिंह रास

हा आठवडा प्रगती आणि यश घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुमचा उत्साह वाढवणारा ठरणार आहे. बँक बॅलेन्स वाढविण्यासाठी आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. घर आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. जोडीदारासोबत उत्तम वेळ व्यतित करणार आहे. या आठवड्यात महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात यश मिळणार आहे.


मिथुन रास

तुम्हाला पुढील सात दिवस नवीन संधी सापडणार आहे. नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभ मिळणार आहे. जुन्या मित्रांची भेटीगाठी आयुष्यात सुखद अनुभव देणार आहे. 
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी तुमचे जीवन सार्थक करणार आहे.

वृषभ रास

हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. नोकरदार असो किंवा व्यावसायिक प्रगती आणि यश घेऊन हा आठवडा घेऊन आला आहे. नवीन संधी तुम्हाला सुखद अनुभव देणार आहे. अडकलेल्या कामांना वेग मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजूबत होणार आहे. बँक बॅलेन्स वाढविण्यासाठी नवीन मार्ग गवसणार आहे. कुटुंबातील सदस्यांची साथ तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत करणार आहे. त्यासोबत या आठवड्यात आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES