SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भाऊबीजेला राहुकाळ! बहिणींनो भावाला ओवळताना ही वेळ टाळा! भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे?

11 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी राहुकाळ असणार आहे, त्यामुळे बहिणींनो भावाला ओवळताना कुठली वेळ टाळायची आहे जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 10, 2026, 21:25 IST | Updated: Nov 10, 2026, 21:28 IST
Image Credit: Bhau Beej
Join

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडव्यानंतर असतो भाऊबीजेचा सण...दिवाळीचा शेवटचा दिवस...हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याला समर्पित आहे.  कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भाऊबीज साजरा करण्यात येते. याला यमद्वितीया असंही म्हटलं जातं. या तिथीला यम आपल्या बहिणीकडे जाऊन अन्न ग्रहण केलं होतं. म्हणून यादिवशी भाऊबीज साजरी करण्यात येते. यंदा 11 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे.

...म्हणून भाऊबीज साजरी करता येतं

पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले आणि तिथे यमुनेने भावाचे औक्षण करून स्वागत केलं. म्हणून या यमद्वितीया असं म्हटलं जातं. बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन साजरा करण्यात येतं. मग दिवाळीत भाऊबीज का? तर वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ मकरंद सरदेशमुख यांनी सांगितलं की, रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भाऊ तिला रक्षा करण्याचे वचन देतो. श्रीकृष्णने द्रौपदीचं रक्षण केलं. तर भाऊबीज हे बहीण भावातील नातं, प्रेम दृढ करण्याचा सण आहे.

भाऊबीजेला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे?

हिंदू धर्मानुसार रक्षाबंधनला बहिणीने भावाच्या घरी जावं. तर भाऊबीजेला भावाने बहिणीच्या घरी जाऊन अन्न ग्रहण करणे शुभ मानले जाते.

औक्षवाण करताना टिळा कसा कोणत्या बोटाने आणि कसा लावावा?

शास्त्रांनुसार अंगठ्याने (थंब) टिळा लावावा. असे केल्याने आरोग्य आणि विजय प्राप्त होतो. टिळक नेहमी कपाळावर खालून वरच्या दिशेने लावणे योग्य मानले जाते. टिळा लावल्यानंतर त्यावर अक्षता म्हणजे अखंड तांदूळ लावा. अक्षता हे पूर्णत्वाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे.

भाऊबीजेसाठी शुभ मुहूर्त काय?


भाऊबीजेला राहुकाळ आहे, मग अशा वेळी कोणत्या वेळी बहिणीने भावाला ओवाळावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सरदेशमुख सांगतात की, भाऊबीज भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे. त्यामुळे यादिवशी वेळ पाहू नये. तरीदेखील 11 नोव्हेंबरला दुपारी 1.30 वाजता राहूकाळ संपतो. त्यानंतर भाऊबीज साजरी करता येणार आहे. पंचांगानुसार भाऊबीजेचा औक्षण करण्यासाठी दुपारी 1:30 ते 3:46 हा सगळ्यात शुभ मुहूर्त आहे. पण तुम्ही त्यानंतरही भावाला ओवाळू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES