लवकर बुध ग्रहाची वक्री चाल! 3 राशींच्या लोकांवर बसरणार पैसा; बँक बॅलेन्स वाढणार
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका ठराविक वेळीला आपली स्थिती बदलतो. लवकरच ग्रहांचा राजकुमार बुध वक्री होणार आहे. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांवर धनवर्षाव होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्र हे ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर भविष्याचे भाकीत करतं. लवकरच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह हा व्रकी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धी, वाणी आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो. त्यामुळे अशा स्थितीत जेव्हा बुध व्रकी होणार तेव्हा आपल्या बुद्धी, वाणी आणि तर्कशक्तीवर त्याचा परिणाम होणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर 2026 रोजी बुध ग्रह वक्री स्थिती असणार आहे. बुधाची ही स्थिती तीन लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम करणारी असणार आहे. कोणत्या आहेत, त्या तीन राशी जाणून घ्या.
कुंभ रास
बुधाची वक्री स्थिती ही या राशीच्या लोकांसाठी फलदायी सिद्ध होणार आहे. या काळात तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. पगारवाढची संकेत आहेत. व्यावसायिक लोकांना व्यवसात भरभराट पाहिला मिळणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांच्या सहकार्याने अनेक कामात तुम्हाला साथ मिळणार असून ते काम पूर्ण करण्यात मदत मिळणार आहे.
हेसुद्धा वाचा - Baba Vanga Prediction 2026 : पुढील 7 दिवसात 5 राशीच्या लोकांसाठी सोन्यासारखे, बाबा वेंगाची भविष्यवाणी
कर्क रास
या राशीच्या लोकांसाठी बुधाची स्थिती अतिशय लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य आणि तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. अगदी तुमच्यावर नवीन जबाबदारीदेखील देण्यात येणार आहे. आर्थिक गुंतवणुकीतून बँक बॅलेन्स वाढणार आहे. कुटुंबातही सुखद अनुभव घेणार आहात.
मेष रास
या लोकांसाठी बुधाची ही बदलणारी स्थिती नशिबाची साथ घेऊन येणार आहे. तुमच्या संवादशैलीतून तुम्ही इतरांना आकर्षित करु शकता. एवढंच नाहीतर कामाच्या ठिकाणी तुमच्या संवादाचा सकारात्मक परिणाम पाहिला मिळणार आहे. तर व्यवसायिकांसाठी धनलाभाचा ठरणार आहे. एक चांगला करार होणार आहे. अगदी अकडलेले पैसे परत मिळणार आहेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)