धनत्रयोदशी 6 किंवा 7 नोव्हेंबरला, नेमकं कधी? जाणून घ्या योग्य तिथी, पूजा आणि खरेदीचा शुभ मुहूर्त
धनत्रयोदशी तिथी 6 नोव्हेंबर ला सकाळी 10.30 सुरु होणार आहे तर 7 नोव्हेंबरला सकाळी 10.47 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे धनत्रयोदशी नेमकी कधी याबद्दल संभ्रम आहे.
दिवाळीचा दुसरा सण म्हणजे धनत्रयोदशी. दिवाळीतील हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा सण आहे. यादिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेरांची विशेष पूजा केली जाते. यादिवशी धन्वंतरी जयंतीदेखील असते, जी वैद्यकिय क्षेत्रातील मंडळी साजरे करतात. वैद्यकिय क्षेत्रात भगवान धन्वंतरीची पूजा करण्यात येते. तसंच यादिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. सोनं, चांदी आणि नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशी तिथीबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे धनत्रयोदशीची योग्य तिथी, पूजेपासून खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या.
धनत्रयोदशी 6 किंवा 7 नोव्हेंबरला, नेमकं कधी?
'द्रिक पंचांग' नुसार धनत्रयोदशी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते. यंदा धनत्रयोदशी तिथी 6 नोव्हेंबर ला सकाळी 10.30 सुरु होणार आहे तर 7 नोव्हेंबरला सकाळी 10.47 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार हिंदू धर्मात सण साजरे करण्यात येतात. पण दिवाळीतील सणांची पूजा ही प्रदोष काळात करतात. त्यामुळे 6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे.
हेसुद्धा वाचा - दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या
धनत्रयोदशी पूजा मुहूर्त - संध्याकाळी 6:02 ते 07:57
प्रदोष कालावधी - संध्याकाळी 05:33 ते रात्री 08:09
सोनं - चांदीसह खरेदीसाठी शुभ मुहूर्त काय?
धनत्रयोदशी 6 नोव्हेंबरला सकाळी 10.30 सुरु होतेय, त्यामुळे त्यानंतर तुम्ही खरेदी करु शकता.
शुभ मुहूर्त
दुपारी - 12:02 ते 1.24 वाजेपर्यंत
दुपारी - 4.07 ते संध्याकाळी 5.29 वाजेपर्यंत
रात्री - 8.46 ते 10.24 वाजेपर्यंत
हेसुद्धा वाचा - दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
धनत्रयोदशीला अशी करा पूजा!
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी जिथे पूजा मांडायची आहे, तिथे पाट मांडा आणि रांगोळी काढा. देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी मूर्ती किंवा फोटो ठेवा. आता त्यांची विधीवत पूजा करा. देवासमोर एखाद्या वाटीत पाच कडधान्य ठेवा. दिवे, फुले, धूप, फळे आणि मिठाई अर्पण करा. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)