दिवाळी पाडव्याला पत्नी पतीचं औक्षण का करते? 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका!
दिवाळी पाडव्याला पत्नी पतीचं औक्षण करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. पण तु्म्हाला या प्रथेमागील कारण माहितीये का?
दिवाळी हा प्रकाशाचा सण... पाच दिवसांचा हा सण आनंद, उत्साह, मांगल्य आणि नात्यांमधील प्रेमाचा सण... त्यामुळे दिवाळी पाडवा हा पती - पत्नींमधील प्रेम द्विगुणीत करणारा सण आहे. यंदा 10 नोव्हेंबरला मंगळवारी बलिप्रतिपदाच्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मात आपण ज्याचे औक्षण करतो त्याच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, अशी मान्यता आहे. मग दिवाळी पाडव्याला पत्नी पतीचं औक्षण करण्यामागे वेगळं काही कारण आहे का?
हिंदू धर्मातील प्रत्येक सण हा शेतीशी निगडीत आहे. शेती प्रती आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सण आहेत. हिंदू पंचांगानुसार, दिवाळी पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा साजरा करण्यात येतो. त्यादिवशी दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ मकरंद सरदेशमुख यांनी सांगितलं की, औक्षण करणे म्हणजे निगेटीव्ही काढून टाकणे. सायन्समध्ये ओरा क्लीनिंग म्हणजेच औक्षण करणे. चक्रा बॅलन्स करणे असं असतो. ओवाळणी केल्यानंतर पॉढिटिव्ह एनर्जी मिळते आणि अग्नि तत्व वाढतं. दिवाळीत थंडी कडक पडते त्यामुळे शरीराला दिव्याच्या ज्योतीतू मिळणारी उष्णतेचे जे काही महत्त्वाची पावर एनर्जी मिळते. त्यामुळे दिवाळी पाडव्याला पत्नीने पतीचं औक्षण करायचं असतं.
ते पुढे म्हणाले की, जसं घरातील पुरुष मंडळांची आपण औक्षण करून ओरा क्लीनिंग म्हणजे नकारात्मक ऊर्जा नाहीशी करतो. यंदापासून घरातील महिलांचेही औक्षण करून त्यांची नजर नक्की काढा. तर दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्त पैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात. त्यासोबतच ज्या कामातून तु्म्हाला पैसा मिळतो, त्या गोष्टींची पूजा करणे शुभ मानले जाते. व्यापारी लोकांसाठी दिवाळी पाडवा म्हणजे व्यापाऱ्याच नवीन वर्ष असतं.
पतीला औक्षण करण्यासाठी सकाळची वेळ शुभ मानली जाते. त्यासोबतच संध्याकाळीही औक्षण करणे चांगल मानलं जातं. दुपारी मात्र औक्षण करु नयेत. दिवाळी पाडव्याला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या.
दिवाळी पाडवा शुभ मुहूर्त
- शुभ चौघडिया मुहूर्त : सकाळी 10:57 मिनिटांपासून दुपारी 12:22 मिनिटांपर्यंत
- अभिजित मुहूर्त : सकाळी 11:59 मिनिटांपासून दुपारी 12:44 मिनिटांपर्यंत.
- औक्षणासाठी योग्य वेळ : सकाळी 11:59 मिनिटांपासून दुपारी 12:22 मिनिटांपर्यंत.
- गोरज मुहूर्त - संध्याकाळी सूर्यास्तापासून 8 वाजेपर्यंत