SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

येत्या 31 ऑक्टोबरपासून धनु आणि कुंभ राशीसह 3 राशींची चांदीच चांदी, गुरू ग्रहाचे सिंह राशीत प्रवेश ठरणार लाभदायक

पंचांगानुसार गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. गुरुचे हे गोचर तीन राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 28, 2026, 06:50 AM IST | Updated: Oct 28, 2026, 06:52 AM IST
Image Credit: Guru Gochar
Join

ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या विशिष्ट आणि ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या स्थिती बदल्यामुळे 12 राशींवर या प्रभाव पडतो. काहींसाठी हे ग्रहांचे हे गोचर लाभदायक असतं. तर काहींसाठी ते संकट घेऊन येत असतं. लवकरच  31 ऑक्टोबरला गुरू ग्रहाचे गोचर होणार आहे. म्हणजे गुरु सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या तीन राशी जाणून घ्या.

कुंभ रास

गुरु गोचरमुळे या राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन आला आहे. व्यावसायिकांना पार्टनरशीपमध्ये मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा असेल तर गुरु तुम्हाला सकारात्मक साथ देणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. विवाह इच्छुकांना चांगला जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. तर तुमची ऑफिसमध्ये प्रतिष्ठा वाढणार आहे. 


धनु रास

गुरु गोचर तुमच्यासाठी आनंदच आनंद घेऊन आला आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे. ज्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी संधी चालून येणार आहे. प्रेम जीवन असो किंवा वैवाहिक जीवन त्यात आनंद आणि प्रेम द्विगुणीत करणारे क्षण येणार आहे. समाजात तुमचा दर्जा वाढणार आहे. तर आरोग्यासंबंधी समस्या दूर होतील.


मेष रास

तुमच्यासाठी गुरु गोचर नवीन दिशा घेऊन आलं आहे. गुरु गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे. करिअर असो किंवा शिक्षणातील मोठं यश असो प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळणार आहे. तर वडिलोपार्जित व्यवसायात गुंतलेल्यांनाही नफा प्राप्त होणार आहे. तुमच्या आरोग्यातही सुधारणा पाहिला मिळणार आहे. या राशीत जन्मलेल्या लोकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी कानावर पडणार आहे.  

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES