SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

केतू गोचरमुळे 6 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर! डिसेंबरपर्यंत प्रत्येक गोष्टीत नकारात्मक परिणाम

ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत केतू गोचरमुळे 6 राशींवर संकटांचा डोंगर कोसळणार आहे. यामध्ये तुमची रास तर नाहीना जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Sep 30, 2026, 02:45 PM IST | Updated: Oct 16, 2026, 01:50 PM IST
Image Credit: केतू गोचरमुळे 6 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर!
Join

वैदिक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितलं की, केतूचा माघ नक्षत्रात डिसेंबर २०२६ पर्यंत असणार आहे.  या दरम्यान नक्षत्राची विविध स्थिती बदलत राहणार आहे. त्यामुळे याचा परिणाम विशेष राशीच्या लोकांवर होणार आहे. ३ ऑक्टोबर २०२६ पासून केतू मघा नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात आहे. या काळात केतू सिंह राशीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, या बदलाचा परिणाम व्यक्तीच्या संपत्ती, कुटुंब, नातेसंबंध, निर्णयक्षमता आणि मानसिक स्थितीवर पाहिला मिळणार आहे. कोणत्या सहा राशीच्या लोकांवर संकटांचा डोंगर कोसळणार आहे, जाणून घ्या. 

वृषभ रास

या लोकांच्या घर, कुटुंब, आई, संपत्ती आणि मानसिक आरोग्यावर केतूच्या स्थिती बदलाचा परिणाम होणार आहे. तुमचे मन कौटुंबिक बाबींमुळे चिंतेत राहणार आहे. कुटुंबासोबतही तुम्हाला भावनिक दुरावा जाणवणार आहे. मालमत्ता किंवा वाहनांशी संबंधित जुने प्रश्न पुन्हा उफाळून येणार आहे. घर बदलण्याबाबत किंवा मालमत्तेसंबंधी कोणतेही मोठे निर्णय घेताना काळजी घ्या. 


कर्क रास

या लोकांच्या संपत्ती, बचत, कुटुंब आणि वाणी यावर नकारात्मक परिणाम दिसणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये खर्च अचानक वाढणार आहे. बचतीवर परिणाम पाहिला मिळणार आहे. आर्थिक बाबींमधील निष्काळजीपणामुळे नुकसानदायक ठरणार आहे. त्याच वेळी, राग किंवा घाईघाईत बोलल्यामुळे कुटुंबात तणाव जाणवणार आहे. बोलताना शब्दांची काळजी या काळात घ्या. 

सिंह रास

या लोकांना आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्वा आणि भविष्यातील वाटचालीविषयी संभ्रम वाटणार आहे. एखाद्या कामात आवड निर्माण झाल्यावर, तुम्हाला अचानक ते काम सोडून द्यावेसे वाटणार आहे. नात्यांमध्ये अनावश्यक अंतर निर्माण होणार आहे. 

कन्या रास

तुम्हाला या काळात अनियोजित खर्च वाढणार आहे. जिथे तुम्हाला तात्काळ फायदा दिसणार नाही, तिथे पैसे गुंतवणे करणे महागात पडणार आहे. झोप आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. परदेश प्रवास किंवा दूरच्या ठिकाणांसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा अन्यथा महागात पडू शकतं. 

मकर रास 

या लोकांच्या आकस्मिक बदल, वारसा हक्क, संयुक्त संपत्ती, गुप्त बाबी आणि जोखीम यावर परिणाम होणार आहे. या काळात कोणताही आर्थिक निर्णय घेणे टाळा अन्यथा नुकसानदायक ठरेल. विमा, कर, वारसा, संयुक्त मालमत्ता किंवा सामायिक आर्थिक बाबींशी संबंधित कागदपत्रांचे सखोल पुनरावलोकन होणार आहे. वाहन चालवताना घाई टाळा. 


कुंभ रास

या लोकांच्या विवाह, जोडीदार, व्यावसायिक भागीदारी आणि जनसंपर्क यावर परिणाम होणार आहे. या काळात, तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये भावनिक दुरावा किंवा संवादाचा अभाव जाणवणार आहे. तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबतही मतभेद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. नवीन जोडीदारावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी, आवश्यक माहितीची पडताळणी करा अन्यथा संकटात सापडाल. नातेसंबंधातील वैयक्तिक बाबी कोणाशीही शेअर करु नका. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES