SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

अष्टमी - नवमी तिथीबद्दल संभ्रम! कन्यापूजा कधी? तर दसरा 20 की 21 ऑक्टोबर नक्की कधी? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त

नवरात्रीचा उत्साह शिगोला पोहोचला आहे. पण महाष्टमी, महानवमी आणि विजयादशमीच्या तिथीबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे. 19 की 20 ऑक्टोबर कधी करायचं कन्यापूजन जाणून घ्या दसऱ्याची योग्य तारीख जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 18, 2026, 11:17 PM IST | Updated: Oct 18, 2026, 11:20 PM IST
Image Credit: navratri 2026
Join

शारदीय नवरात्रीचा उत्साह नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा करण्यात येत आहे. नवरात्रीमध्ये महाष्टमी आणि महानवमीला विशेष महत्त्व आहे. या दोन तिथीला कन्यापूजेला अतिशय महत्त्व आहे. अष्टमी, नवमी आणि दशमी तिथी दोन दिवसांमध्ये आल्या आहेत. 19 ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमी आहे. तर 20 ऑक्टोबरला नवमी आणि दशमी आहे. त्यामुळे कन्यापूजन नेमकं कधी करायचं याबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे. कारण महाराष्ट्रात उदय तिथीनुसार सण आणि व्रताची तिथी मानली जाते.

महाष्टमी, महानवमी आणि विजयादशमी तिथी कधी?


मराठी पंचांगानुसार अष्टमी तिथी 18 ऑक्टोबर 2026 रविवारी सकाळी 8:27 वाजेपासून 19 ऑक्टोबर 2026 सोमवारी सकाळी 10:52 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर नवमी तिथी सुरू होणार असून ती 20 ऑक्टोबर 2026 दुपारी 12:50 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर दशमी तिथी सुरु होणार आहे. अशा स्थितीत  19 ऑक्टोबर 2026 ला सोमवारी महाष्टमी असणार आहे. त्यानंतर नवमी तिथीसुद्धा आहे. त्यामुळे 19 ऑक्टोबर 2026 ला सकाळी 10:52 नंतर कन्यापूजा तुम्ही करू शकता. तर 20 ऑक्टोबर 2026 दुपारी 12:50 वाजेपूर्वीही नवमी तिथी असल्याने तुम्ही कन्या पूजा केल्यास काही हरकत नाही.

कन्यापूजेसाठी काय तयारी करावी?

घरातील देवघर स्वच्छ करून देवीसमोर दिवा, अगरबत्ती, फुले, कुंकू, अक्षता आणि नैवेद्य ठेवा. त्यानंतर कन्यांना आदराने पूजेसाठी आमंत्रित करा.मग कन्यांना स्वच्छ आसनावर बसवून त्यांचे प्रेमाने स्वागत करा. घरच्या परंपरेनुसार पाय धुऊन, कपाळावर कुंकू आणि अक्षता लावून पूजन करा. त्यानंतर देवीची आरती करून कन्यांना हलवा, पुरी, काळे चणे, फळे किंवा घरच्या परंपरेतील सात्त्विक भोजन द्या. तसंच आपल्या क्षमतेनुसार फळे, पुस्तके, उपयोगी वस्तू, कपडे किंवा दक्षिणा द्या.


दसरा म्हणजे विजयादशमी 20 की 21 ऑक्टोबर नक्की कधी?


अष्टमी आणि नवमी तिथीसोबत दसरा तारखेबद्दलही संभ्रम आहे. कारण उदय तिथीनुसार 21 ऑक्टोबर 2026 ला दशमी तिथी मानली जातेय. पण महाराष्ट्रात विजयादशमी म्हणजेच दसरा हा 20 ऑक्टोबर 2026 साजरा करण्यात येणार आहे. पण महाराष्ट्र सोडून इतर राज्यात दसरा हा 21 ऑक्टोबर 2026 ला साजरा केला जाणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES