SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या लोकांची चांदी! शनीचं पॉवरफुल नक्षत्र परिवर्तनामुळे नोकरी, प्रेम, सुख-समृद्धी...

ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत पाच राशीच्या लोकांसाठी चांदीच चांदी असणार आहे. शनीचं पॉवरफुल नक्षत्र परिवर्तनामुळे नोकरी, प्रेम, सुख-समृद्धी घेऊन आला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 12, 2026, 08:08 PM IST | Updated: Oct 12, 2026, 08:13 PM IST
Image Credit: ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या लोकांची चांदी!
Join

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव हा कर्म, शिस्त आणि न्याच याचा कारक मानला जातो. 9 ऑक्टोबर 2026 ला शनी उत्तराभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश केला आहे. या स्थिती शनिदेव फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे. सध्या शनी मीन राशीत असला तरी त्याचा नक्षत्र बदल झाला आहे. शनिदेवाची सर्वांना भीती वाटते कारण तो आपल्याला कर्माची शिक्षा देतो. खरंतर शनिची कुठलीही बदल हे नकारात्मक नसते. शनिचे हे नक्षत्र बदल पाच राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली सिद्ध होणार आहे.

मीन रास 


या राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी स्थिरता मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्नांना सुवर्ण संधी मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी आणि उत्तम पर्याय मिळणार आहे. तर व्यवसायातील रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. अडकलेले किंवा उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सर्व बाजूने विचार न करता घेऊ नका.


कुंभ रास

या पाच महिन्यांमध्ये तुम्हाला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. अडकलेल्या कामांना गती मिळणार आहे. वरिष्ठांकडून तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाणार आहे. नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा महत्त्वाच्या प्रकल्पात काम उत्तम संधी मिळणार आहे. बँक बॅलेन्स वाढविण्याच्या उत्तम संधी मिळणार आहे. नियोजनबद्ध काम आणि नियम तुम्हाला उत्तम संधी देणार आहेत.


मकर रास 
 


करिअरमध्ये स्थिरता आणण्यासाठी या महिन्यांमध्ये नशिबाची तुम्हाला उत्तम साथ मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम पर्याय लाभणार आहे. व्यवसाय विस्तारांच्या तुमच्या योजनांना छान साथ मिळणार आहे. या महिन्यांमध्ये परिस्थिती अनुकूल राहणार आहे. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ छान राहणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे विश्वास आणि वरिष्ठांकडून कौतुक हे होणार आहे.


सिंह रास

व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीची दखल घेण्याचा हा क्षण असणार आहे. नोकरदार लोकांसाठी वरिष्ठांकडून कौतुक, नवीन पदाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नव्या संपर्कांमधून काम मिळणार आहे. रखडलेल्या योजनांना पुन्हा चालना मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अनावश्यक खर्च आणि जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहणे हिताचे ठरणार आहे.


मेष रास

कामातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. नोकरदार लोकांना इतर ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा असेल तर चांगली नोकरीचा पर्याय दिसणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. नवीन ग्राहक मिळणार आहे. शिवाय रखडलेले प्रकल्पांना चालना मिळणार आहे. कामाचा विस्तार होणार आहे. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या.


(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES