SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बुध - शनिचा षडाष्टक योग 4 राशीच्या लोकांसाठी महाभयंकर! राहावं लागणार अत्यंत सावधान

बुध-शनि युतीमुळे चार राशींना मोठा तणाव जाणवणार आहे. त्यामुळे, या राशींना प्रत्येक बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगावी असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 03, 2026, 01:49 PM IST | Updated: Oct 16, 2026, 02:25 PM IST
Image Credit: बुध - शनिचा षडाष्टक योग 4 राशीच्या लोकांसाठी महाभयंकर
Join

वैदिक ज्योतिषशास्त्र हे ग्रह - नक्षत्र यांच्या स्थितीवर अवलंबून असतं. येत्या 9 ऑक्टोबरला बुध आणि शनी एकमेकांपासून 150 अंशांवर स्थिर होणार आहे, यातून अशुभ असा षडाष्टक योग निर्माण होणार आहे. हा योग अत्यंत वेदनादायी असणार आहे. मानसिक ताणात वाढ आणि निर्णयक्षमतेवर परिणार पाहिला मिळणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना या काळात काळजी घ्यायची आहे, जाणून घ्या. 


मेष रास 

या लोकांना नकारात्मक परिणाम पाहिला मिळणार आहे. मोठ्या आर्थिक आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. खर्चाही अचानक वाढ होणार आहे. अविचार तुम्हाला अस्वस्थ करणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याचे चिन्ह आहेत. बोलण्यावर संयम ठेवा. 
 

मिथुन रास  

या लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तुमची आर्थिक स्थिती गडमगणार आहे. कोणतेही काम करताना काळजी घ्यावी लागणार आहे. तुमचं मतभेद होण्याचे चिन्हं आहेत. कोणावरही आंधळा विश्वास तुमच्यासाठी घातक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी थोडासा निष्काळजीपणा संकटाना आमंत्रण देईल. 

कन्या रास 

तुमच्यासाठी हा योग नकारात्मक ठरणार आहे. तुमच्या निर्णयक्षमतेवर वाईट परिणाम पाहिला मिळेल. कोणत्याही गोष्टीत घाई करु नका. मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण असणार आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्चामुळे बजेट गडबडणार आहे. 

वृश्चिक रास 

तुमच्यासाठी हा योग धोकादायक असणार आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोणत्याही गोष्टीत घाई करणे महागात पडू शकतं. गुंतवणूक करताना काळजी घ्या अन्यथा संकटात सापडाल. गाडी चालवताना काळजी घ्या. कोणाशीही वाद घालू नका. 
 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES