तुळशी विवाह कधीपासून? यंदा असणार फार कमी दिवस! फक्त 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका!
दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशी विवाह सोहळ्याचे. देवउठनी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. यंदा तुळशी विवाह कधीपर्यंत आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या.
हिंदू धर्मशास्त्रात तुळशी विवाहाला अतिशय महत्त्व आहे. दिवाळीचा सण झाल्यावर प्रतीक्षा असते ती तुळशी विवाह सोहळ्याची... तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. हिंदूचा हा अत्यंत पवित्र आणि मंगलमय सण भागवत एकादशी किंवा देवउठनी एकादशीपासून सुरु होता. तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो. यंदा कधीपासून कधीपर्यंत हा सोहळा असणार आहे. तुळशी विवाह सोहळ्याचा शुभ मुहूर्त काय, सर्व माहिती एका क्लिकवर जाणून घ्या.
तुळशी विवाह कधीपासून?
पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला म्हणजे एकादशी तिथीला तुळशी विवाह प्रारंभ होतो. यंदा शनिवार, 21 नोव्हेंबर 2026 रोजी तुळशी विवाहाला सुरुवात होणार आहे. तर कार्तिकी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करता येतात. खरंतर असंख्य लोक एकादशीलाच तुळशीविवाह करतात. पण काही लोक आपल्या सोयीनुसार एकादशी ते पौर्णिमेपर्यंत हा सोहळा साजरा करतात. तर यंदा पौर्णिमा तिथी 24 नोव्हेंबर 2026 ला असणार आहे. याचा अर्थ यंदा तुळशीविवाहसाठी चार दिवस असणार आहे.
21 नोव्हेंबर 2026 ला तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:25 मिनिटांपासून रात्री 7:49 मिनिटांपर्यंत असणार आहे.
तुळशी विवाह पूजा
तुळशीच्या शेजारी पाटावर भगवान शाळिग्राम किंवा श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करा. त्यांना पिवळे वस्त्र, फुले आणि चंदन अर्पण करा. तुळशी माता आणि भगवान विष्णू यांची हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून पूजा करा. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा. तुळशी माता आणि शाळिग्राम यांच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणा. त्यानंतर अक्षता टाकून विवाह सोहळा पार पाडा. पारंपरिक पद्धतीने तुळशीला शालिग्रामासोबत सात फेरेही दिले जातात. विवाहानंतर तुळशी माता आणि भगवान विष्णू यांची आरती करा. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा आणि प्रसाद वाटा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)