• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /बोहल्यावर चढायला वर्षाअखेर 'इतके'च दिवस शुभ, तारीख चुकली तर थेट 2027

बोहल्यावर चढायला वर्षाअखेर 'इतके'च दिवस शुभ, तारीख चुकली तर थेट 2027

उत्साहात साखरपुडा उरकल्यानंतर वर्षाअखेर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये सनई-चौघडे वाजवण्याचा विचार करत असाल, तर पंचांगातील मुहूर्तांची माहिती जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 05, 2026, 02:44 PM IST|Updated: Oct 05, 2026, 02:47 PM IST
joinshare
बोहल्यावर चढायला वर्षाअखेर 'इतके'च दिवस शुभ, तारीख चुकली तर थेट 2027
Image Credit: तारीख चुकली तर थेट 2027

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उत्साहात साखरपुडा उरकला आणि आता डोक्यात थेट लग्नाचे वेध लागलेत? दोन-तीन महिन्यांत छानसा हॉल बुक करू आणि थंडीच्या दिवसांत वाजवू सनई-चौघडे असा प्लॅन करून अनेक कुटुंबं लग्नाच्या तयारीत गुंतली आहेत. पण थांबा! जर तुम्ही वर्षाअखेर लग्न उरकण्याचा विचार करत असाल, तर पंचांगातील गणित ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. कारण साखरपुडा जरी झटपट झाला असला, तरी बोहल्यावर चढण्यासाठी मात्र प्रचंड मोठी कसरत करावी लागणार आहे.  सध्या चातुर्मास सुरू असल्यानं सर्व प्रकारच्या शुभ कार्यांना आणि लग्नसोहळ्यांना ब्रेक लागला आहे. ऑक्टोबर महिना तर तोंडावर आलाय, पण या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात लग्नाचा एकही शुभ मुहूर्त उपलब्ध नाही. त्यामुळं ज्यांना वाटत होते की साखरपुड्यानंतर लगेच पुढच्या महिन्यात लगीनघाई सुरू करता येईल, त्यांच्या पदरी पूर्ण निराशा पडणार आहे.

पंचांगानुसार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी 'देवउठणी एकादशी' (प्रबोधिनी एकादशी) आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि तुळशी विवाहाची सुरुवात होऊन विवाह मुहूर्तांचे दार उघडते. म्हणजेच, 20 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही शास्त्रोक्त पद्धतीनं लग्नाची गाठ बांधता येणार नाही.20 नोव्हेंबरला देव जागे झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात लग्न करण्यासाठी हातात उरतात अवघे 10 दिवस! या 10 दिवसांमध्ये पंचांगाने लग्नासाठी केवळ 4 शुभ मुहूर्त दिले आहेत (उदा. 21, 24,25 नोव्हेंबर आणि आणखी एक तारीख). एकाच वेळी लाखो इच्छुक आणि मुहूर्त फक्त चार; त्यामुळे या चार दिवसांसाठी आत्तापासूनच मॅरेज हॉल, लॉन्स आणि भटजींचे बुकिंग मिळणे कठीण आहे.

नोव्हेंबर संपल्यानंतर वर्ष संपायला फक्त डिसेंबर महिना शिल्लक राहतो. या डिसेंबर महिन्यात विवाहाचे केवळ 7 शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून मोजले तरी परिस्थिती इतकी बिकट आहे की, एकाच मुहूर्तावर एकाच हॉलमध्ये दोन-दोन शिफ्टमध्ये लग्न लावण्याची वेळ केटरर्स आणि व्यवस्थापकांवर येईल; परिणामी हॉलचे भाडे दुपटीने वाढले आहे. दरवर्षी साधारणपणे 80 ते 100 लग्न मुहूर्त असतात, पण 2026 या संपूर्ण वर्षात केवळ 59 च मुहूर्त मिळाले. मे-जूनमध्ये आलेला 'ज्येष्ठ अधिक मास', त्यानंतरचा प्रदीर्घ चातुर्मास आणि वर्षाच्या सुरुवातीला झालेला शुक्राचा अस्त यामुळे शेकडो तारखा पंचांगातून बाद झाल्या. त्यामुळेच वर्षाच्या शेवटी लग्न करू पाहणाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

2026 संपण्यापूर्वी वर्षभरात आता फक्त 11 लग्न मुहूर्त शिल्लक आहेत; जर या 11 दिवसांत हॉल किंवा तारीख मिळाली नाही, तर थेट 2027 चीच वाट पाहावी लागेल! मात्र दिलासादायक बाब म्हणजे, 2026 मधील ही 11 दिवसांची घाई आणि चढ्या भावातील बुकिंग टाळल्यास, 2027 च्या सुरुवातीला तब्बल 96 हून अधिक मुहूर्त आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Spirituality