• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /18 वर्षीय क्रिकेटपटूचे अचानक निधन; क्रिकेटविश्वात शोककळा

18 वर्षीय क्रिकेटपटूचे अचानक निधन; क्रिकेटविश्वात शोककळा

क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला, 18 वर्षीय क्रिकेटपटूचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे, बोर्डाने ही माहिती सोशल मिडियावर शेअर केली आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 25, 2026, 10:49 AM IST|Updated: Oct 25, 2026, 11:22 AM IST
joinshare
18 वर्षीय क्रिकेटपटूचे अचानक निधन; क्रिकेटविश्वात शोककळा

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

क्रिकेट विश्वामध्ये शोककळा पसरली आहे, बांगलादेशचा उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू मेहदी हसन हृदोय याचे वयाच्या 18व्या वर्षी निधन झाले आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने त्यांच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. मेहदी हसन हृदोय हा अंडर 18 च्या बांग्लादेश संघाकडून खेळला होता, मेहदी हसन हृदोय याला ल्युकेमियाने ग्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. 24 ऑक्टोबर रोजी राजधानी ढाका येथे त्याचे निधन झाले. बांग्लादेशचा हा युवा खेळाडू मेहदी हसन हृदोय याच्या निधनानंतर क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी मेहदी हसन हृदोय याच्या निधनाची माहिती दिली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सोशल मिडियावर हृदोयच्या निधनाबद्दल पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत बीसीबीने लिहिले, "हृदोयने चट्टोग्राम डिव्हिजनच्या 18 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि एक उज्ज्वल भविष्य असलेला आश्वासक डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. या कठीण काळात बीसीबी हृदोयच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना आपल्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो आणि या दुःखाच्या काळात त्याच्या कुटुंबियांना शक्ती व धैर्य देवो."

हे ही वाचा

एमएस धोनी आयपीएल 2027 खेळणार की नाही? THALA ने स्वतः सांगितले! म्हणाला 'तुम्हाला खात्री'

बांगलादेशी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाका येथे बांग्लादेशचा खेळाडू ह्रदॉय याला उपचारासाठी नेण्यात आले होते. यावेळी त्याला रुग्णवाहिकेमध्ये नेत असतानाशनिवारी मेहदी हसन हृदोय यांचे निधन झाले, ही माहिती बोर्डाने शेअर केली आहे. मेहदी हसन हृदोय याच्या वैद्यकीय खर्चासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत देखील केली आहे. 2 जुलै रोजी, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री अमीनुल हक यांनी बीसीबी कार्यालयात हृदोय यांचे वडील अबुल कासेम यांना 5,00,000 टकांचा धनादेश सुपूर्द केला.

5 जुलै रोजी बांग्लादेश सरकारने देखील मदत केली होती, युवा आणि क्रिडा मंत्रालयाने हृदोयच्या वैद्यकीय खर्चासाठी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली होती. खेळाडूच्या कुटुंबाला 5,00,000 टाकांची स्वतंत्र रक्कमही दिली. हृदोयच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि बांगलादेश क्रिकेट समुदायात धक्का बसला आहे.
 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News
Sports News
Marathi News