• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /भारतीय महिला क्रिकेटच्या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राच्या चार खेळाडूंचे मोलाचे योगदान! पहिल्या कसोटी विजयाचा सुवर्णमहोत्सव

भारतीय महिला क्रिकेटच्या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राच्या चार खेळाडूंचे मोलाचे योगदान! पहिल्या कसोटी विजयाचा सुवर्णमहोत्सव

19 नोव्हेंबर 1976 रोजी पाटण्याच्या मोईन-उल-हक स्टेडियमवर भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजचा पाच गडी राखून पराभव करत पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली होती. या ऐतिहासिक विजयाला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत, या विजयामध्ये कोणकोणत्या खेळाडूंचे मोलाचे योगदान होते यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 18, 2026, 16:55 IST|Updated: Nov 18, 2026, 19:10 IST
joinshare
भारतीय महिला क्रिकेटच्या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राच्या चार खेळाडूंचे मोलाचे योगदान! पहिल्या कसोटी विजयाचा सुवर्णमहोत्सव

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

2025 मध्ये भारताच्या संघाने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तेव्हापासून भारतीय क्रिकेटला एक वेगळी उंची मिळाली आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील एका सुवर्णक्षणाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. 19 नोव्हेंबर 1976 रोजी पाटण्याच्या मोईन-उल-हक स्टेडियमवर भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजचा पाच गडी राखून पराभव करत पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली होती. अवघ्या चौथ्याच कसोटीत मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राच्या चार महिला क्रिकेटपटूंचा सहभाग होता. आज भारतीय महिला क्रिकेट विश्वविजेतेपदापर्यंत पोहोचले असताना, त्या विजयाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे. आज महिला क्रिकेटपटूंना जागतिक दर्जाच्या सुविधा, व्यावसायिक संधी आणि आर्थिक पाठबळ मिळत आहे. मात्र, पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. ना पुरेशा सुविधा, ना आर्थिक स्थैर्य, ना प्रसिद्धीचे वलय. अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय महिलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजय मिळवू शकतात, हा विश्वास पाटण्यातील त्या सामन्याने निर्माण केला.

भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय

17 ते 19 नोव्हेंबर 1976 दरम्यान झालेल्या या तीन दिवसांच्या कसोटीत वेस्ट इंडीजचा पहिला डाव 127 धावांत संपुष्टात आला. डायना एडुलजी (3/24), शुभांगी कुलकर्णी (3/43) आणि कर्णधार शांता रंगास्वामी (2/11) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात फौजिया खलिली यांच्या 58 आणि रंगास्वामी यांच्या 32 धावांच्या जोरावर भारताने नऊ बाद 161 धावांवर डाव घोषित करत 34 धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात शुभांगी कुलकर्णी यांनी अवघ्या 14 धावांत चार, तर शर्मिला चक्रवर्ती यांनी 17 धावांत तीन बळी घेतल्याने वेस्ट इंडीजचा डाव 88 धावांत आटोपला. भारतासमोर विजयासाठी अवघ्या 55 धावांचे लक्ष्य होते. मात्र, भारतीय संघाची अवस्था पाच बाद 25 अशी झाली. अशा बिकट परिस्थितीत डायना एडुलजी आणि सुसान इत्तिचेरिया यांनी 30 धावांची नाबाद भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. नाबाद 20 धावा करणाऱ्या एडुलजी यांनीच विजयी धाव घेतली.

संघर्षाच्या काळातील विजयाने दिला आत्मविश्वास

1976 मध्ये भारतीय महिला क्रिकेटची आंतरराष्ट्रीय वाटचाल नुकतीच सुरू झाली होती. 1976 मध्ये स्थापन झालेली वुमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया मर्यादित साधनांवर काम करत होती. खेळाडूंना अनेकदा स्वतःच्या खर्चाने क्रिकेट साहित्य घ्यावे लागे. रेल्वेच्या साध्या डब्यांतून प्रवास, अपुऱ्या निवाससुविधा आणि मानधनाचा अभाव अशा परिस्थितीत त्या देशाचे प्रतिनिधित्व करत होत्या. संघातील अनेक खेळाडू अवघ्या 17-18 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या. अशा काळात हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत मिळालेला पाटण्यातील विजय महिला क्रिकेटसाठी निर्णायक ठरला. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रेक्षकांनी खेळाडूंना घेरले, त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि संघाच्या बसभोवती गर्दी केली. पुरुष क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या लोकप्रियतेचा अनुभव प्रथमच महिला खेळाडूंनाही आला. या विजयामुळे महिला क्रिकेटला सार्वजनिक मान्यता मिळण्यास हातभार लागला आणि पुढील पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले.

विजयी संघातील महाराष्ट्राच्या चार कन्या

शुभांगी कुलकर्णी (पुणे) : पाटण्यातील विजयाच्या प्रमुख शिल्पकार ठरलेल्या शुभांगी कुलकर्णी यांनी दोन्ही डावांत मिळून ५७ धावांत सात बळी घेतले. सहा कसोटींच्या मालिकेत सर्वाधिक २३ बळी त्यांच्या नावावर होते. पुढे त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि महिला क्रिकेटच्या प्रशासनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. २००६ मध्ये महिला क्रिकेट बीसीसीआयकडे येण्याच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

डायना एडुलजी (मुंबई) : पहिल्या डावात तीन बळी घेणाऱ्या एडुलजी यांनी दुसऱ्या डावात नाबाद २० धावांची निर्णायक खेळी करत भारताचा विजय निश्चित केला. पुढे भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. अर्जुन पुरस्कार, पद्मश्री आणि आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवण्याचा सन्मान त्यांना लाभला.

शोभा पंडित (मुंबई) : आघाडीच्या फलंदाज असलेल्या शोभा पंडित यांनी पाटण्यातील कसोटीत महत्त्वाच्या झेलासह संघाच्या विजयात योगदान दिले. १९७३ मध्ये पुण्यात झालेल्या पहिल्या राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेतील मुंबईच्या विजयी संघातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी भारतासाठी आठ कसोटी सामने खेळले.

उज्ज्वला निकम (पुणे) : पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या उज्ज्वला निकम या भारतीय महिला क्रिकेटच्या पहिल्या पिढीतील खेळाडू होत्या. पाटण्यातील कसोटीत त्यांनी मधल्या फळीत फलंदाजी केली. त्यांनी भारताचे आठ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आणि १९७८ च्या विश्वचषकातही सहभाग नोंदवला.

पाटणा ते नवी मुंबई; महिला क्रिकेटचा सुवर्णकाळ

गेल्या दोन दशकांत भारतीय महिला क्रिकेटचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये बीसीसीआयने महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान आंतरराष्ट्रीय सामना मानधन जाहीर केले. 2023 मध्ये महिला प्रीमियर लीग सुरू झाल्याने महिला क्रिकेटला मोठे व्यावसायिक व्यासपीठ मिळाले. डिसेंबर 2023 मध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारताने इंग्लंडचा 348 धावांनी पराभव करत महिला कसोटी क्रिकेटमधील धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय नोंदवला. त्याच महिन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलावहिला कसोटी विजय मिळवला. जून 2024 मध्ये चेन्नईत भारताने सहा बाद 603 धावा उभारत महिला कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला.

2 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयाने भारतीय महिला क्रिकेटच्या यशस्वी वाटचालीवर विश्वविजेतेपदाची मोहोर उमटवली. यंदा जुलै 2026 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या कसोटी विजयाने भारतीय महिला क्रिकेटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला. एकेकाळी दुसऱ्या कसोटी विजयासाठी २६ वर्षे वाट पाहणाऱ्या भारतीय संघाने आता जागतिक क्रिकेटमध्ये आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. अर्थात, महिलांना अधिक कसोटी सामने आणि देशांतर्गत स्तरावर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान कायम आहे.

आजच्या सुवर्णकाळाचा पाया

पाटण्यातील पहिला कसोटी विजय आणि आजचा भारतीय महिला क्रिकेटचा सुवर्णकाळ यांच्यातील अंतर केवळ पन्नास वर्षांचे नाही, तर दोन वेगवेगळ्या युगांचे आहे. एकीकडे अपुऱ्या साधनांत, आर्थिक पाठबळाशिवाय आणि मर्यादित संधींमध्ये देशासाठी खेळणाऱ्या तरुणी होत्या; तर दुसरीकडे आज जागतिक दर्जाच्या सुविधा, व्यावसायिक स्पर्धा आणि लाखो चाहत्यांचे प्रोत्साहन मिळवणाऱ्या महिला क्रिकेटपटू आहेत. या परिवर्तनाचा पाया घालण्यात पाटण्यातील त्या ऐतिहासिक विजयाचा मोठा वाटा आहे. पुण्याच्या नेहरू स्टेडियमपासून पाटणा, मुंबई आणि नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासात महाराष्ट्राच्या महिला क्रिकेटपटूंनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाटण्यातील विजयाचा सुवर्णमहोत्सव हा केवळ एका ऐतिहासिक सामन्याच्या स्मृती जागवण्याचा दिवस नाही; तर भारतीय महिला क्रिकेटच्या आजच्या वैभवाचा पाया घालणाऱ्या पहिल्या पिढीच्या जिद्दीला, संघर्षाला आणि कर्तृत्वाला अभिवादन करण्याचा क्षण आहे.

‘पाटण्यातील विजयाने भारतीय महिला क्रिकेटला नवी ओळख दिली’

“1976 मध्ये आम्ही पहिलीच आंतरराष्ट्रीय कसोटी मालिका खेळत होतो. संघातील बहुतांश खेळाडू अवघ्या 17-18 वर्षांच्या होत्या आणि महिला क्रिकेटला पुरेशा सुविधा, मान्यता किंवा आर्थिक पाठबळ नव्हते. अशा परिस्थितीत पाटण्यात मिळवलेला पहिला कसोटी विजय हा केवळ आमच्या संघासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय महिला क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. भरगच्च स्टेडियममधील प्रेक्षकांचा जल्लोष आणि आमच्या कामगिरीला मिळालेल्या प्रतिसादामुळे महिला क्रिकेटलाही मोठा लोकाश्रय मिळू शकतो, याची जाणीव झाली. या विजयाने भारतीय महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होऊ शकतात, हा विश्वास निर्माण केला. सात बळी मिळवल्याचा वैयक्तिक आनंद होता; मात्र इतिहास घडवणाऱ्या त्या संघाचा भाग असल्याचे समाधान माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे.”

 - शुभांगी कुलकर्णी, माजी भारतीय क्रिकेटपटू

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News