आर्यवीरची आयपीएलमध्ये होणार एंट्री! वीरेंद्र सेहवागने स्वत: केला खुलासा
मागील काही दिवसांपासून आर्यवीर सेहवाग हा त्याच्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला आहे. आता आर्यवीर सेहवागचे वडिल म्हणजेच भारताचे दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने मोठे विधान त्याच्या मुलासाठी केले आहे.
नुकतीच अंडर 19 आशिया कप स्पर्धा पार पडली, या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत करुन विजेतेपद नावावर केले. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याच्या मुलाने कमालीची कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. वीरेंद्र सेहवागच्या मुलाने आशिया कपमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतके ठोकली त्याच्या या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले होते. मागील काही दिवसांपासून आर्यवीर सेहवाग हा त्याच्या कामगिरीमुळे सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला आहे. आता आर्यवीर सेहवागचे वडिल म्हणजेच भारताचे दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने मोठे विधान त्याच्या मुलासाठी केले आहे.
आर्यवीर सेहवागने नुकत्याच झालेल्या आशिया कप 2026 च्या स्पर्धेमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आर्यवीरच्या कामगिरीबद्दल जेव्हा वीरेंद्र सेहवागला विचारण्यात आले त्यावेळी दिग्गजाने सांगितले की, "मला खूप आनंद आहे की आर्यवीरने भारताच्या १९ वर्षांखालील आशिया कप विजयात योगदान दिले. त्याने अंतिम सामन्यात विशेषतः चांगली खेळी केली. मी आर्यवीरला नेहमी सांगायचो की, जर तुला आदर मिळवायचा असेल, तर तुला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्याने अंडर 19 आशिया कप स्पर्धेमध्ये त्याची क्षमता त्याने दाखवून दिली.
हे ही वाचा
'आम्ही देखील बाटलीची झाकणे वापरली...' सँडपेपरच्या वादादरम्यान शोएब अख्तरचा मोठा खुलासा!
आर्यवीर सेहवाग आयपीएलमध्ये प्रवेश करणार का?
वीरेंद्र सेहवाग यांना आता आपल्या मुलाला आयपीएलमध्ये खेळताना पाहायचे आहे. वीरेंद्र सेहवागने नुकतीच एक मुलाखत दिली आहे यामध्ये त्याने त्याच्या मुलाच्या भविष्याबद्दल सांगितले आहे. आपल्या मुलाच्या पुढील वाटचालीबद्दल सांगताना ते एएनआयला म्हणाले, "मला अभिमान आहे की माझा मुलगा चांगला खेळला. त्याला सर्वांचे प्रेम मिळाले. मला आशा आहे की आर्यवीर आता लिलावात जाईल आणि एखादी फ्रँचायझी त्याला नक्कीच निवडेल. त्याने चांगली कामगिरी केली आहे आणि तो या संधीसाठी पात्र आहे."
वैभव सूर्यवंशीने अंडर 19 मध्ये कमालीची कामगिरी केली आणि त्यानंतर त्याला राजस्थान रॅायल्सच्या संघामध्ये स्थान मिळाले आणि त्याचे आयुष्य बदलले. आर्यवीर सेहवागच्या अंडर 19 आशिया कप 2026 च्या स्पर्धेमधील कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर आशिया कपमध्ये आर्यवीर सेहवागला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरवण्यात आले. त्याने पाच डावांमध्ये 90.25 च्या सरासरीने फलंदाजीने केल्या, त्याने पाच इनिंगमध्ये 361 धावा केल्या. आर्यवीरने 95.50 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने संपूर्ण स्पर्धेत एकूण 38 चौकार आणि 16 षटकार मारले. त्याने भारतीय संघाचा भावी खेळाडू म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याला लवकरच आयपीएलमध्ये संधी मिळू शकते.