• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /अभिषेक शर्मा सूर्यकुमार यादवचा रेकॅार्ड मोडणार? नवा टी20 'सिक्सर किंग' बनण्याच्या तयारीत

अभिषेक शर्मा सूर्यकुमार यादवचा रेकॅार्ड मोडणार? नवा टी20 'सिक्सर किंग' बनण्याच्या तयारीत

अभिषेक शर्मा हा भारतीय संघाचा हिरो आहे, त्याने कमी वेळात भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यामध्ये त्याने 30 चेंडूमध्ये 69 धावांची खेळी खेळली, चौथ्या टी20 सामन्यात अभिषेक नवा सिक्सर किंग बनू शकतो आणि सूर्यकुमार यादवचा रेकॅार्ड मोडू शकतो.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 12, 2026, 04:20 PM IST|Updated: Oct 12, 2026, 04:33 PM IST
joinshare
अभिषेक शर्मा सूर्यकुमार यादवचा रेकॅार्ड मोडणार? नवा टी20 'सिक्सर किंग' बनण्याच्या तयारीत

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Abhishek Sharma Record : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 11 ऑक्टोबर रोजी टी20 मालिकेचा तिसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 14 धावांनी विजय मिळवला, या सामन्यात भारताने गोलंदाजीच्या जोरावर या सामन्यामध्ये विजय मिळवला. पण टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा या सामन्यामध्ये देखील दमदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेमध्ये विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाने मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे, आता या सामन्यामध्ये अभिषेक शर्माच्या दमदार कामगिरीनंतर त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा 4 वर्ष जुना रेकॅार्ड मोडला आहे.

अभिषेक शर्मा हा भारतीय संघाचा हिरो आहे, त्याने कमी वेळात भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यामध्ये त्याने 30 चेंडूमध्ये 69 धावांची खेळी खेळली, यामध्ये त्याने पाच षटकार मारले. हिल्या दोन सामन्यांमध्ये अभिषेक अपयशी ठरला होता, पण आता तो पुन्हा फॉर्मात आला आहे. चौथ्या टी20 सामन्यात अभिषेक नवा सिक्सर किंग बनू शकतो. तो सूर्यकुमार यादवचा चार वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. मागील काही वर्ष जेव्हापासून अभिषेक शर्माने भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे तेव्हापासून त्याने टी20 मध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात षटकार मारून तो इतिहास रचणार आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे. 2022 मध्ये तो स्फोटक फॉर्ममध्ये होता आणि त्याने 68 षटकार मारले होते. गेल्या चार वर्षांत कोणीही त्याचा विक्रम मोडू शकलेले नाही. अभिषेक पुढच्या सामन्यात त्याला मागे टाकू शकतो. तो 68 षटकारांसह सूर्याच्या बरोबरीत आहे. तो त्याच्या पुढच्या सामन्यात एक मोठी कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. अभिषेक शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध 230 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली यामध्ये त्याने सहा चौकार आणि पाच षटकार मारले.

चौथा टी20सामना कधी होणार?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी20  मालिका आता रोमांचक झाली आहे. वेस्ट इंडिज संघ पुढील सामन्यात पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. दोन्ही संघांमधील चौथा टी20 सामना 14 ऑक्टोबर रोजी हैदराबादमधील उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. सामना नेहमीप्रमाणे सायंकाळी 7.00 वाजता सुरू होईल. भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News
IND vs WI
Sports News