Shahid Kapoor : बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर हा त्याच्या दमदार अभिनयासाठी सोबतच त्याच्या स्टायलिश अंदाजासाठी सुद्धा ओळखला जातो. शाहिदकडे अनेक आलिशान गाड्या असून आता अभिनेत्याने आपल्या कार कलेक्शनमध्ये खूप पॉवरफुल आणि महागड्या एसयूवीचा देखील समावेश केला आहे. शाहिद कपूरने जवळपास 3.04 कोटी रुपये खर्च करून नवीन लँड रोवर डिफेंडर 110 ऑक्टा खरेदी केली आहे. ही एक हाय रफॉर्मेंस मॉडल डिफेंडर सीरिजमधील सर्वात महागडी वेरिएंट्सपैकी एक असून ती आपल्या पॉवर आणि आलिशानतेसाठी प्रसिद्ध आहे.
समोर आली नवीन गाडीचा फोटो :
शाहिद कपूरच्या नव्या गाडीचा फोटो तेव्हा व्हायरल झाला जेव्हा एका इंस्टाग्राम पेजने शाहिद कपूरचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये शाहिद कपूर त्याची नवी कोरी लँड रोव्हर डिफेंडर ऑक्टा कार चालवताना दिसला.
का खास आहे लंड रोवर डिफेंडर 110 ऑक्टा?
डिफेंडर 110 ऑक्टा (Defender 110 Octa) हे लँड रोव्हरच्या लोकप्रिय एसयूव्ही (SUV) श्रेणीतील प्रमुख परफॉर्मन्स मॉडेल आहे. इतर डिफेंडर मॉडेल्सच्या तुलनेत, या विशेष आवृत्तीमध्ये अत्यंत शक्तिशाली V8 इंजिन देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त यात अनेक महत्त्वपूर्ण परफॉर्मन्स सुधारणा केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सर्वात शक्तिशाली एसयूव्हीपैकी एक ठरते. मात्र कंपनीने आपला क्लासिक, रांगडा लूक आणि प्रभावी ऑफ-रोडिंग क्षमता कायम ठेवली आहे.
भारतात किती आहे आलिशान SUV ची किंमत :
जर या आलिशान SUV कारच्या किंमती विषयी बोलायचं झालं तर भारतामध्ये, लँड रोव्हर डिफेंडर 110 ऑक्टा ची एक्स शोरूम किंमत प्रकारानुसार अंदाजे 2.42 कोटी ते 2.62 कोटींच्या दरम्यान आहे. मात्र बातम्यांनुसार मुंबईत रजिस्ट्रेशन, टॅक्स आणि अन्य चार्जेसमुले या कारची ऑन रोड किंमत ही जवळपास 3.04 कोटी रुपये आहे.