जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका सध्या सुरु आहेत, या मालिकांदरम्यान आयसीसीने नवी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा संघाची वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका झाली तर दुसरीकडे अफगाणिस्तानने अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्धची तिरंगी मालिका जिंकली. अफगाणिस्तानच्या विजयानंतर आता आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमावारीमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने इंग्लंडला मागे टाकले आहे. आता या नव्या क्रमवारीमध्ये अफगाणिस्तानच्या क्रमवारीमध्ये वाढ झाली आहे, कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे यासंदर्भात वाचा.
विश्वचषकामध्ये झिम्बाब्वेच्या संघाची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली होती, अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या मालिकेच्या अंतिम सामन्यात अफगाण गोलंदाजांनी झिम्बाब्वेला अवघ्या 169 धावांत गुंडाळले. रशीद खानने सर्वाधिक तीन, तर फजलहक फारुकीने दोन विकेट्स संघासाठी घेतले. त्यानंतर इब्राहिम झद्रानने नाबाद 70 धावा आणि कर्णधार रहमत शाहने 43 धावा करून संघाला 35 व्या षटकात लक्ष्य गाठण्यास मदत केली. या विजयामुळे अफगाणिस्तानला क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा करता आली. अफगाणिस्तानचा संघ एकदिवसीय क्रमवारीमध्ये 94 रेटींगसह सातव्या स्थानावर आहे त्याचे 2926 गुण आहेत.
हे ही वाचा
आयसीसीच्या नव्या ताज्या क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानावर कायम आहे, 115 रेटींगसह 4122 गुणांसह टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ 109 रेटींग आणि 3809 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे साऊथ आफ्रिकेचे 3547 गुण आहेत. तर श्रीलंका आणि पाकिस्तानकडून पराभव झाल्यामुळे इंग्लंडला नुकसान सोसावे लागले. 115 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या भारताचे आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत वर्चस्व कायम आहे. न्यूझीलंड 109 रेटिंग गुणांसह दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिका 104 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Cricket was born in England but currently in ODI cricket ICC Ranking England is at number 8. - Afghanistan - Sri lanka - Pakistan Are also ahead of England https://t.co/qqBvXqx8oE
— One liner advice (@quote_for_daily) October 24, 2026
पाकिस्तानचा संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये 3505 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा संघ पाचव्या स्थानावर आहे, कांगारुचे 3568 गुण आहेत. अंतिम फेरीत पोहोचलेल्या झिम्बाब्वेलाही दोन रेटिंग गुण मिळाले, परंतु संघ ११व्या स्थानावरच राहिला. ही स्पर्धा बांगलादेशसाठी निराशाजनक ठरली. संघाला एकही विजय मिळवता आला नाही आणि त्यांचे रेटिंग गुण दोनने कमी झाले. तरीही, बांगलादेश नवव्या स्थानावर कायम आहे.