ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी 2035 पर्यंतच्या प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनासाठीच्या कालावधीला मंजुरी दिली. आता कोणत्या स्पर्धा कधी खेळवल्या जाणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2035 पर्यंतच्या प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांच्या वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे. इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या बैठकांनंतर आयसीसी बोर्डाने हा निर्णय घेतला. या वेळापत्रकात एकदिवसीय विश्वचषक, टी20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्याचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) रविवारी 2035 पर्यंतच्या प्रमुख पुरुष क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनासाठीच्या कालावधीला मंजुरी दिली. आता कोणत्या स्पर्धा कधी खेळवल्या जाणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
भारत 9 ते 28 ऑक्टोबर 2029 दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आणि 9 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे सह-आयोजन करेल. 2021 नंतर होणाऱ्या स्पर्धांसाठी यजमान देशांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी, त्यांच्या तारखा सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. आयसीसीचा नियोजित कार्यक्रम 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकाने सुरू होईल आणि 2035 मधील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत चालेल. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी निवेदन जाहीर केले आहे.
हे ही वाचा
IND vs NZ सामन्यादरम्यान मोहम्मद सिराज इशान किशनवर संतापला, नक्की झाले काय?
"खेळाडूंना आणि सदस्य राष्ट्रांना या स्पर्धांविषयीची माहिती खूप आधीच देण्याचे महत्त्व आम्हाला समजते. यामुळे आम्हाला खेळाडूंचा विकास, उच्च-कार्यक्षमता कार्यक्रम आणि एक सुव्यवस्थित क्रिकेट वेळापत्रक यासाठी उत्तम योजना तयार करण्यास मदत होईल," असे ते म्हणाले. भारत बांगलादेशसोबत 2021 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सह-आयोजन करेल. 2035 च्या एकदिवसीय विश्वचषकाचेही आयोजन निश्चित झाले आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाईल, मात्र यजमान देश अद्याप ठरलेला नाही. 2028 चा टी20 विश्वचषक 12 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केला जाईल.
पुढील स्पर्धा 2030 मध्ये इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाईल. त्यानंतरचे टी20 विश्वचषक 2032 आणि 2034 मध्ये आयोजित केले जातील. तथापि, या दोन स्पर्धांसाठी यजमान देश आणि ठिकाणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना 2035 पर्यंत दर दोन वर्षांनी जूनमध्ये आयोजित केला जाईल. इंग्लंड 2029 आणि 2031 च्या अंतिम सामन्यांचे आयोजन करेल, तर 2033 आणि 2035 च्या अंतिम सामन्यांसाठी यजमान देश नंतर जाहीर केले जातील.