SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

विराट - अनुष्का पुन्हा आई बाबा होणार? मुंबईतील कार्यक्रमादरम्यान व्हायरल Photo मुळे चर्चेला उधाण

Anushka Sharma Pregnant For Third Time Viral Photo : विराट - अनुष्का पुन्हा आई बाबा अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलेलं आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे नुकतेच मुंबईतील एका भजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना त्यादरम्यान अनुष्काचे काही फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर फॅन्स अनुष्का पुन्हा गरोदर असल्याचं म्हणत आहेत.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 27, 2026, 01:30 PM IST | Updated: Oct 27, 2026, 02:15 PM IST
Image Credit: विराट - अनुष्का पुन्हा आई बाबा होणार? मुंबईतील कार्यक्रमादरम्यान व्हायरल Photo मुळे चर्चेला उधाण
Join

Virat Kohli And Anushka Sharma : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे अनेक पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. या दोघांना दोन मुलं असून यातील मुलीचं नाव वामिका आणि मुलाचं नाव अकाय असं आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे नुकतेच मुंबईतील एका भजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या दरम्यान अनुष्का शर्माने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला. सध्या या कार्यक्रमातील दोघांचे फोटो व्हायरल होत असून यात अनुष्का शर्माचा बेबी बंब दिसत असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अनुष्का शर्मा ही पुन्हा गरोदर असल्याचं बोललं जात आहे.

अनुष्का शर्मा पुन्हा गरोदर?

रविवारी 25 ऑक्टोबर रोजी अनुष्का शर्मा तिचा पती विराट कोहलीसोबत मुंबईत दिसून आली. या जोडप्याने वरळी येथील 'द डोम, एसव्हीपी स्टेडियम'ध्ये अमेरिकन भक्ती संगीत गायक 'कृष्णा दास' यांच्या लाईव्ह कीर्तन कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याआधी त्यांना गेटवे ऑफ इंडियाजवळही पाहण्यात आले होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा भक्तिगीत गुणगुणताना आणि टाळी वाजवून प्रतिसाद देताना दिसत आहे. तर विराट सुद्धा अनुष्काच्या शेजारी बसलेला होता. अनुष्काला पाहिल्यावर 'अनुष्का गरोदर आहे का?', असा प्रश्न सोशल मीडियावर काही लोक उपस्थित करू लागले.

एका युजरने विचारले, 'अनुष्का पुन्हा गरोदर आहे का?' तर दुसऱ्या एका युजरने असा प्रश्न उपस्थित केला की, केवळ त्यांनाच अभिनेत्री गरोदर असल्याचे वाटत आहे का? की आणखीन कोणाला सुद्धा तसंच वाटतंय?'. आणखी एका युजरने गंमतीत म्हटले, 'अनुष्काला स्वतःलाही कदाचित ट्विटरवरूनच समजले असेल की ती गरोदर आहे!' मात्र हे केवळ सोशल मीडिया वापरकर्त्यांचे तर्क आहेत. अनुष्का शर्मा ही गरोदर असल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

2017 मध्ये झालेलं दोघांचं लग्न :

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा विवाह डिसेंबर 2017 मध्ये झाला. जानेवारी 2021 मध्ये त्यांची मुलगी वामिकाचा जन्म झाला. त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांच्या मुलाचा, अकायचा जन्म झाला. विराट आणि अनुष्का शर्माने आपल्या मुलांना प्रसिद्धीच्या झोतातून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची कोणतीही बातमी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES