U19 आशिया कपमध्ये आर्यवीर सेहवागची तुफानी फलंदाजी; सर्वाधिक धावा करत रचला इतिहास
फायनलच्या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवागने अर्धशतक झळकावले पण त्याने फक्त फायनलमध्येच नाही तर संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा फार्म दाखवला आणि या स्पर्धेमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये अंडर 19 आशिया कप 2026 चा फायनलचा सामना खेळवण्यात आला. भारताच्या संघाने पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन 1 विकेट्सने पराभूत केले. टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवागने या स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी कमालीची कामगिरी केली. फायनलच्या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवागने अर्धशतक झळकावले पण त्याने फक्त फायनलमध्येच नाही तर संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा फार्म दाखवला आणि या स्पर्धेमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आर्यवीर सेहवागने संघासाठी आशिया कप 2026 मध्ये कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा.
आर्यवीर सेहवागची कामगिरी
अंडर 19 आशिया कप 2026 मध्ये आर्यवीर सेहवागने त्याचे वडील आणि टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागची झलक पाहायला मिळाली. त्याने या स्पर्धेमध्ये पाच सामन्यांमध्ये 90.25 च्या एवरेजने 361 धावा केल्या, यामध्ये त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली. या त्याच्या कामगिरीनंतर स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे, त्याचबरोबर सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीमध्ये देखील तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने संपूर्ण स्पर्धेत एकूण 38 चौकार आणि 16 षटकार मारले. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या उस्मान खानच्या नावावर होता. त्याने याच आशिया कपमध्ये पाच डावांमध्ये 345 धावा केल्या होत्या. आता, आर्यवीरने त्याला मागे टाकून इतिहास रचला आहे.
हे ही वाचा
6,6,6,6,4,4,4,4,4,4... उर्विल पटेलने SMAT 2026 मध्ये घातला धुमाकूळ!
भारताचे दिग्गज माजी खेळाडू आर्यवीर सेहवाचे वडिल वीरेंद्र सेहवाग यांनी सोशल मिडियावर संघाचे अभिनंदन केले आहे. सोशल मिडियावर वीरेंद्र सेहवागने सोशल मिडियावर काही फोटो शेअर करुन अभिनंदन केले आहे आणि लिहीले आहे की, काय सामना होता! काय शेवट होता! 19 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात 338 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला हरवण्यासाठी जबरदस्त हिंमत लागते. लक्ष्याच्या 80 धावा, आर्यावीरच्या 58 धावा, आणि मग जेव्हा चमत्काराची गरज होती तेव्हा मनाल चौहान आणि मोहित उल्वा यांचा जलवा. काय अविश्वसनीय विजय होता हा. या तरुण चॅम्पियन्सचा अभिमान वाटतो! ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी आठ धावांची गरज होती. पहिल्या पाच चेंडूंवर केवळ पाच धावा झाल्या होत्या. हातात फक्त एक गडी शिल्लक असताना, शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. मोहित उल्वाने संयम दाखवत चौकार मारला आणि भारताला चॅम्पियन बनवले. हा फटका कायम स्मरणात राहील. त्याने महत्त्वपूर्ण नाबाद 49 धावांची खेळी केली.