SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कृणाल पांड्या सोबत मैदानात धक्कादायक प्रकार! प्रेक्षकाने त्याच्या दिशेने भिरकवला बूट, Video समोर

Throw Shoes Towards Krunal Pandya : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोदा विरुद्ध झारखंड सामन्यानंतर प्रेक्षकाने कर्णधार कृणाल पांड्याच्या दिशेने बूट भिरकावला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 26, 2026, 19:16 IST | Updated: Nov 26, 2026, 19:46 IST
Image Credit: कृणाल पांड्या सोबत मैदानात धक्कादायक प्रकार! प्रेक्षकाने त्याच्या दिशेने भिरकवला बूट, Video समोर
Join

Throw Shoes Towards Krunal Pandya : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 च्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बडोदा आणि झारखंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात बडोदाचा कर्णधार कृणाल पांड्या जेव्हा फॅन्सना ऑटोग्राफ देण्यासाठी बाउंड्री रोपजवळ आला तेव्हा एका प्रेक्षकाने त्याच्या दिशेने बूट भिरकावला. या फेकलेला बूट लागण्यापासून कृणाल पांड्याला ठोक्यात वाचला. सुरुवातीला राग व्यक्त करण्याऐवजी कृणालने संयम बाळगला आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आलेल्या फॅन्सला नाराज न करता तो तेथे उभा राहिला.

बूट लागण्यापासून ठोक्यात बचावला कृणाल :

संपूर्ण घटना तेव्हा घडली जेव्हा कृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोदा संघाने झारखंडला ५ विकेटने पराभूत केले. सामना संपल्यानंतर कृणाल पांड्या हा बाउंड्री लाईनवर वाट पाहत होता, तेव्हा फॅन्सने याला ऑटोग्राफ देण्यासाठी बोलावलं. कृणालने बाउंड्री रोप पार करताच गर्दीतून एका प्रेक्षकाने कृणालच्या दिशेने बूट भिरकावला. कृणाल पांड्याने त्याच्या दिशेने येणार एक बूट पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हद्द तेव्हा झाली जेव्हा अजून एक बूट कृणालच्या दिशेने भिरकावला गेला. कृणाल पांड्या या घटनेत दुखापत होण्यापासून वाचला खरा मात्र त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याने बूट फेकणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने बोट केले आणि त्याला सक्त ताकीद दिली. मात्र काही वेळानंतर कृणाल लगेचच शांत झाला आणि इतर फॅन्सना ऑटोग्राफ देऊ लागला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  

कृणालच्या नेतृत्वात बडोदा संघाची उत्तम कामगिरी :

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये कृणाल पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा बडोदा संघ हा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स करत असून आतापर्यंत स्पर्धेत खेळण्यात आलेल्या 6 पैकी 5 सामने त्यांनी जिंकले आहेत. चंदीगड  विरुद्ध एका सामन्यात पराभव झाल्यावर उर्वरित सर्व सामने जिंकून बडोदा संघ सध्या 20 पॉईंट्सने ग्रुपच्या टॉप स्थानावर आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES