डर्बन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये मालिका पार पडली, या मालिकेनंतर आता 214 धावांनी मोठा विजय नोंदवण्यात आला आहे. आता या मालिकेनंतर अनेक बदल गुणतालिकेमध्ये झाले आहेत हे बदल नक्की कोणते झाले आहेत यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत. डर्बन कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 214 धावांनी मोठा विजय नोंदवला. या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला मागील WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले होते पण या सायकलमध्ये आतापर्यत ऑस्ट्रेलियाचा संघ दमदार फार्ममध्ये पाहायला मिळाला आहे.
मागील सिझनचा विजेता संघ दक्षिण आफ्रिका, तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. न्यूझीलंड गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या या चक्रात बांगलादेशने अपवादात्मक कामगिरी केली आहे. या शेजारी देशाने गुणतालिकेत आपले चौथे स्थान कायम राखले आहे, तर भारतीय संघ पाचव्या स्थानावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या चक्रात इंग्लंडची कामगिरी भारतापेक्षाही खराब झाली असून, तो सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज आठव्या, तर पाकिस्तान नवव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने 2025-27 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले असून, त्यापैकी नऊ सामने जिंकले आहेत आणि त्यांची विजयाची टक्केवारी 81.82 आहे.
न्यूझीलंड गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी तो सर्वात प्रबळ दावेदार आहे. न्यूझीलंडने या चक्रात आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी चार सामने जिंकले आहेत आणि त्यांची विजयाची टक्केवारी 72.22आहे. मंगळवार सकाळपर्यंत दुसऱ्या स्थानावर असलेला दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेने या चक्रात आतापर्यंत पाच सामने खेळले असून, त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांची विजयाची टक्केवारी 60 आहे. बांगलादेशने या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांनी सहा सामने खेळून त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांची विजयाची टक्केवारी 55.56 आहे. या यादीत भारत पाचव्या स्थानावर आहे.
भारताने या चक्रात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले असून, त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. त्यांची विजयाची टक्केवारी 51.52 असून, त्यामुळे ते पाचव्या स्थानावर आहे. शुभमन गिलने या मालिकेत भारतासाठी 1024 धावा केल्या असून तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मोहम्मद सिराजने 43 बळी घेतले आहेत. भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका अजून बाकी आहे, आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही मालिकांमधील बहुसंख्य सामने जिंकणे आवश्यक आहे. जर भारताने एकापेक्षा जास्त सामने गमावले, तर अंतिम फेरीत पोहोचण्याचे त्याचे स्वप्न भंगेल.