धक्कादायक! ग्रीनच्या तोंडावर चेंडू लागला अन् मैदानावर कोसळला; तोंडातून रक्त येताच सोडले मैदान
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन या अपघाताचा बळी ठरला. त्याच्या चेहऱ्यावर रक्तस्त्राव होणारी जखम झाली. त्याला मैदानाबाहेर न्यावे लागले आणि तो संपूर्ण सामन्यातून बाहेर झाला.
आयपीएल 2027 ची रिटेन आणि रिलीज लिस्ट काही तासांपूर्वीच फ्रन्चायझींनी जाहीर केली होती. एकिकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय सामना आज पार पडला, या सामन्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यादरम्यान एक अपघात घडला. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन या अपघाताचा बळी ठरला. होबार्ट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान, फलंदाजी करत असताना चेंडू कॅमेरॉन ग्रीनच्या हेल्मेटला लागला, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर रक्तस्त्राव होणारी जखम झाली. त्याला मैदानाबाहेर न्यावे लागले आणि तो संपूर्ण सामन्यातून बाहेर झाला.
कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2027 साठी आपला सर्वात महागडा परदेशी खेळाडू, कॅमेरॉन ग्रीनवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. फ्रँचायझीने त्याला तब्बल 25 कोटी 20 लाख रुपयांना संघात कायम ठेवले आहे. पण केकेआर व्यवस्थापन आणि चाहत्यांनी या निर्णयाचा आनंद साजरा केलाही नव्हता, तोच दुसऱ्या दिवशी एक अशी बातमी आली, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला. बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कॅमेरॉन ग्रीनला एक धोकादायक बाउन्सर लागला. चेंडू ग्रीनच्या हेल्मेटच्या ग्रीलवर इतक्या जोरात आदळला की त्याच्या ओठातून रक्त येऊ लागले आणि त्याला दुखापतग्रस्त होऊन मैदान सोडावे लागले. ही घटना होबार्ट येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील अंतिम एकदिवसीय सामन्यादरम्यान घडली.
सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सनने एक आखूड चेंडू टाकला. तो बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू नीट उसळला नाही. ग्रीनने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे चुकला. चेंडू त्याच्या हेल्मेटच्या ग्रीलला लागून त्याच्या ओठाजवळ लागला आणि लगेचच रक्त उसळले. ऑस्ट्रेलियन वैद्यकीय पथक आले आणि त्यांनी ग्रीनची तपासणी केली, पण त्यांना यश आले नाही. अखेरीस, कॅमेरॉन ग्रीनला दुखापतग्रस्त होऊन खेळातून बाहेर पडावे लागले.