बीसीसीआयच्या मुख्य निवडर्त्यांची घोषणा, 'या' माजी खेळाडूने घेतली अजित आगरकर यांची जागा
मागील काही काळापासून अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय पुरुष संघाचा नवा निवडकर्ता कोण होणार याबद्दल चर्चा सुरु होती आता बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी एक मोठी घोषणा केली, मागील काही काळापासून भारतीय पुरुष संघाचा नवा निवडकर्ता कोण होणार यासंदर्भात चर्चा सुरु होती. माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची टीम इंडियाचे नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून निवड झाली आहे. ते अजित आगरकर यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारतील. आगरकर यांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबर रोजी संपला, त्यानंतर 40 वर्षीय ओझा हंगामी प्रमुख होते. बीसीसीआयने पुरुष निवड समितीत रमेश पवार यांचा समावेश केला आहे. ज्येष्ठतेच्या (कसोटी सामन्यांची संख्या) आधारावर ओझा यांची समितीचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी भारतासाठी 24 कसोटी, 18 एकदिवसीय आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ते जून 2008 ते नोव्हेंबर 2013 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होते.
बीसीसीआयने सोशल मिडियावर अधिकृत घोषणा मुख्य निवडकर्त्यांची केली आहे. बीसीसीआयने सोशल मिडियावर लिहीले आहे की, श्री रमेश पोवार यांची पुरुष निवड समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठतेनुसार (सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले), श्री प्रज्ञान ओझा हे या समितीचे अध्यक्ष असतील. बीसीसीआय, समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात दाखवलेली वचनबद्धता, दृढनिश्चय आणि दिलेल्या योगदानाबद्दल श्री. अजित आगरकर यांचे कौतुक करते.
शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.